LIC Scheme : मुलांचे भविष्य होईल सुरक्षित! LIC च्या योजनेत ‘या’ करा फक्त 150 रुपयांची गुंतवणूक, मिळेल 8,44,500 रुपयांचा परतावा

LIC Scheme

LIC Scheme : मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन योग्य त्या वेळी करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण सध्याच्या काळात मुलांचे शिक्षण आणि लग्नाच्या खर्चात खूप वाढ झाली आहे. तुम्ही आता LIC च्या योजनेच्या मदतीने मुलांच्या गरजा पूर्ण करू शकता.

समजा तुम्ही तुमचे बचतीचे पैसे एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवले, तर काही ठराविक काळानंतर तुम्हाला त्यावर जबरदस्त परतावा मिळतो. त्यापैकीच एक पॉलिसी म्हणजे LIC जीवन तरुण पॉलिसी. काय आहे ही पॉलिसी? जाणून घ्या.

काय आहे LIC जीवन तरुण पॉलिसी?

अनेकांना असा प्रश्न पडला असेल की काय आहे एलआयसीची ही योजना? तर LIC जीवन तरुण पॉलिसी ही एक न जोडलेली, सहभागी, वैयक्तिक, जीवन विमा बचत योजना असून जर तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला संरक्षण आणि बचत अशा दोन्ही सुविधा मिळतील. आता तुम्ही मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही पॉलिसी घेण्यासाठी, तुमच्या मुलांचे वय कमीत कमी 90 दिवस असावे. तर ही योजना 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी घेता येत नाही.

किती रक्कम भरावी लागणार?

मूल 25 वर्षांचे झाल्यानंतर या पॉलिसी अंतर्गत संपूर्ण फायदे मिळतील. तुम्हाला मूल 20 वर्षांचे होईपर्यंत प्रीमियम भरावा लागणार आहे. तुम्हाला ही पॉलिसी 75,000 रुपयांच्या कमीत कमी विमा रकमेवर घेता येईल. हे लक्षात घ्या की यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली नाही.

दररोज करा 150 रुपयांची बचत

आता तुम्ही तुमच्या मुलांसाठी दररोज 150 रुपयांची बचत केली आणि ती रक्कम जीवन तरुण पॉलिसीमध्ये गुंतवणूक केली तर तुमचा वार्षिक प्रीमियम रु 54,000 असणार आहे. अशा प्रकारे, आठ वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 4,32,000 रुपये इतकी होईल. यानंतर तुम्हाला गुंतवणुकीच्या रकमेवर 2,47,000 रुपयांचा बोनस मिळू शकतो. तसेच पॉलिसीची विमा रक्कम पाच लाख रुपये इतकी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला लॉयल्टी बोनस म्हणून 97,000 रुपये मिळतात. अशा प्रकारे तुम्हाला 8,44,500 रुपये मिळतात.

आता कोणालाही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर प्रीमियम भरता येईल. एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी सादर केली आहे. तुम्ही आता तुमच्या मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करू शकता. ही अतिशय सुरक्षित मानली जात असल्याने अनेकजण यात गुंतवणूक करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe