LIC Scheme : तुम्ही देखील तुमच्या भविष्याचा विचार करून पैसे गुंतवणुकीसाठी सर्वात बेस्ट योजना शोधात असाल तर आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट आणि बेस्ट योजनेबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेऊन तुम्ही अवघ्या काही वर्षात तब्बल 50 लाखांहून जास्त पैसे कमवू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या ही भन्नाट योजना एलआयसीच्या मार्फत राबवली जाते. तुम्हाला ही योजना सुरक्षितता आणि बचत दोन्ही प्रदान करते. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट एलआयसी योजनेबद्दल संपूर्ण माहिती.
आम्ही आज एलआयसीच्या जीवन लाभ योजनेबद्दल तुम्हाला माहिती देत आहोत ज्याच्या तुम्हाला बंपर फायदा देखील होऊ शकते. जीवन लाभ योजना ही नॉन-लिंक पॉलिसी आहे जे मुदतपूर्तीनंतर पॉलिसीधारकाला एकरकमी रक्कम देते. यातील खास गोष्ट म्हणजे 25 चा प्लॅन घेऊन तुम्ही दररोज फक्त 253 रुपयांची बचत करून मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये मिळवू शकता.

शेअर मार्केटवर अवलंबून नसल्यामुळे एलआयसीची ही योजनाही सुरक्षित मानली जाते. यामध्ये, पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला लाभ दिला जातो. जर तुम्ही पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल, तर जीवन लाभ योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. मॅच्युरिटीवर 54 लाख रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी, तुम्हाला ही पॉलिसी 25 वर्षांसाठी खरेदी करावी लागेल. यानुसार, दररोज 253 रुपयांची बचत केल्यानंतर, तुम्ही दरमहा सुमारे 7,700 रुपये आणि दरवर्षी सुमारे 92,400 रुपये जमा कराल आणि सर्व प्रीमियम भरण्यासाठी एकूण सुमारे 20 लाख रुपये जमा कराल. तेथे तुम्हाला 54 लाख रुपये एकरकमी मिळतील.
वयोमर्यादा
LIC ची जीवन लाभ पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा किमान 18 वर्षे आणि कमाल 59 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीने ही पॉलिसी 21 वर्षांच्या पॉलिसी टर्मवर घेतली असेल, तर पॉलिसी घेताना त्याचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी, व्यक्तीची वयोमर्यादा 50 वर्षे असावी. पॉलिसीच्या परिपक्वतेसाठी कमाल वयोमर्यादा 75 वर्षे ठेवण्यात आली आहे.
वैशिष्ट्ये
पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास त्याचा लाभ नॉमिनीला मिळतो. आम्ही तुम्हाला सांगतो बोनससोबतच विमा कंपनी विम्याच्या रकमेचा लाभही नॉमिनीला देते. मृत्यू लाभ हा या पॉलिसीचा सर्वात मोठा प्लस पॉइंट मानला जातो.
यामध्ये पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम परत केली जाते, जर पॉलिसी तुटलेली नसेल आणि सर्व प्रीमियम भरले गेले असतील. या जीवन लाभ पॉलिसीमध्ये पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, विमा रक्कम वार्षिक प्रीमियमच्या सात पटीने उपलब्ध आहे. हा मृत्यू लाभ मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या सर्व प्रीमियमच्या 105% पेक्षा कमी असू शकत नाही. यासह, यात पॉलिसीसाठी लागू केलेला कोणताही कर किंवा कोणतीही अतिरिक्त रक्कम समाविष्ट होणार नाही.
हे पण वाचा :- Holi 2023 Rashifal: पुढच्या होळीपर्यंत ‘या’ 4 राशींच्या लोकांची मजा ! होणार बंपर फायदा ; वाचा सविस्तर