‘हा’ सरकारी Share 1000 रुपये पार करणार! ब्रोकरेजचा मोठा खुलासा…. क्विक वाचा ब्रोकरेजने दिलेली टार्गेट प्राईस

भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.25% पर्यंत कमी केला. 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली आणि दिल्ली निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरीही बाजारात मोठी तेजी पाहायला मिळालेली नाही.

Ratnakar Ashok Patil
Published:

LIC Share Price:- भारतीय शेअर बाजारात सध्या मोठी अस्थिरता दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.25% पर्यंत कमी केला. 12 लाख रुपयांची आयकर सूट दिली आणि दिल्ली निवडणुकीत भाजपचा विजय झाला तरीही बाजारात मोठी तेजी पाहायला मिळालेली नाही.

सोमवारी (10 फेब्रुवारी) सलग चौथ्या दिवशी बाजार घसरला आणि सेन्सेक्स 671 अंकांनी कमी होऊन 77,189 वर पोहोचला. तर निफ्टी 202 अंकांनी घसरून 23,357.6 वर स्थिरावला. सध्या बाजार आपल्या उच्चांकापेक्षा 10% खाली व्यवहार करत आहे. अशा परिस्थितीत मजबूत मूलभूत तत्त्वे असलेल्या शेअर्सकडे गुंतवणूकदारांचा कल वाढला आहे.

तज्ञांनी दिला एलआयसी शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला

ब्रोकरेज कंपन्यांनी सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सेंट्रम ब्रोकिंग या आघाडीच्या ब्रोकरेज कंपनीने एलआयसीसाठी 1,220 रुपयांचे टार्गेट दिले आहे.

गेल्या आठवड्यात एलआयसीचा शेअर 816 रुपयांवर बंद झाला होता. याचा अर्थ पुढील काही महिन्यांत गुंतवणूकदारांना 50% पर्यंत परतावा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या एका महिन्यात एलआयसीच्या शेअरमध्ये 6% वाढ झाली आहे.तर एका वर्षात या शेअरमध्ये 25% वाढ झाली आहे.

ब्रोकरजने दिली टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मनेही एलआयसीला खरेदी करण्याचा सल्ला दिला असून त्यांनी 1,085 रुपयांचे टार्गेट सेट केले आहे.ज्यामुळे गुंतवणूकदारांना 33% परतावा मिळू शकतो.

तसेच कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एलआयसीसाठी 1,250 रुपयांचे टार्गेट दिले आहे.ज्यामुळे गुंतवणूकदारांना तब्बल 53% परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्रोकरेज कंपन्यांचा विश्वास आहे की हा सरकारी शेअर भविष्यात दमदार परतावा देऊ शकतो.

एलआयसीचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल

एलआयसीच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालांवर नजर टाकल्यास 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 11,056 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला. जो मागील वर्षाच्या तुलनेत 17% अधिक आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन आणि कल्याणकारी खर्च 30% ने घटून 6,691 कोटी रुपये झाले आहेत. एलआयसी ही भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असून तिच्या देशभरात 2048 कार्यालये आणि 10 लाखांहून अधिक एजंट आहेत.

एलआयसीच्या शेअरच्या गेल्या काही महिन्यांतील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास तीन महिन्यांत हा शेअर 11.49% घसरला आहे. तर सहा महिन्यांत 28.58% घसरण झाली आहे.

एलआयसीचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1,221 रुपये आहे. तर नीचांक 804 रुपये आहे. सध्या बीएसईवरील या शेअरचे एकूण मार्केट कॅप 5,12,735 कोटी रुपये आहे. गुंतवणूकदारांसाठी हा शेअर दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe