LIC Policy : भारतात असे अनेक लोक आहेत ज्यांचा एलआयसी अर्थात जीवन विमा महामंडळावर प्रचंड विश्वास आहे. लोकांना सुरक्षिततेसाठी तसेच चांगला परतावा मिळण्यासाठी एलआयसी विमा किंवा पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला आवडते. त्यात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक प्रकारच्या पॉलिसी योजना आहेत. दरम्यान, एलआयसीची जीवन आनंद पॉलिसी खूप चर्चेत आहे.
यामध्ये एखादी व्यक्ती रोज फक्त 45 रुपयांची बचत करून 25 लाख रुपयांचा फंड तयार करू शकते. ही पॉलिसी अत्यंत कमी प्रीमियमसह उच्च परताव्यासाठी खूप चांगला पर्याय आहे. ही एक टर्म पॉलिसी योजना आहे ज्यामध्ये पॉलिसी धारकाला मॅच्युरिटी लाभ देखील दिला जातो. यामध्ये किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा नाही.
जीवन आनंद पॉलिसीमध्ये उपलब्ध फायदे :-
-पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला 125 टक्के मृत्यू लाभाचा लाभ मिळतो.
-यामध्ये करमाफीचा लाभ दिला जात नाही.
-या पॉलिसीमध्ये ॲक्सिडेंट बेनिफिट रायडर, न्यू क्रिटिकल बेनिफिट रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडरचे फायदे दिले आहेत.
एलआयसी जीवन आनंद पॉलिसी कॅल्क्युलेशन
यामध्ये व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 1358 रुपये जमा करावे लागतील, त्यानंतर त्याला 25 लाख रुपये मिळू शकतील. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त 45 रुपये जमा करावे लागतील. ही एक प्रकारची दीर्घकालीन योजना आहे ज्यामध्ये 15 वर्षे ते 35 वर्षे गुंतवणूक करावी लागते.
जर तुम्ही यामध्ये 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 25 लाख रुपये दिले जातील. या पॉलिसीमध्ये तुम्ही वार्षिक 16,300 रुपयांपर्यंत बचत करू शकाल.