LIC Jeevan Pragati Plan : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते. आज LICच्या अशा एक योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, जी सध्या सर्वत्र लोकप्रिय होत आहे.
सध्याच्या महागाईच्या युगात, लोकांसाठी पैसे गुंतवणे खूप महत्वाचे झाले आहे, जेणेकरून त्यांचे काम, मुलांचे शिक्षण, लग्न आणि अशी अनेक मोठी स्वप्ने पूर्ण करता येतील. अशातच जर तुम्ही अशा योजनेत गुंतवणूक करण्याची योजना आखात असाल जी कमाईसह बंपर फायदे देईल तर LIC जीवन प्रगती योजना तुमच्यासाठी फायद्याची असेल.

सध्या, देशातील लोक LIC च्या आश्चर्यकारक योजनांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण येथे सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे LIC च्या अनेक योजना देशभरात खूप लोकप्रिय आहेत.
एलआयसी जीवन प्रगती योजना ही एक नॉन-लिंक्ड आहे, ही योजना तुम्हाला संरक्षण आणि बचत दोन्ही प्रदान करते. त्यामुळे ती सर्वत्र लोकप्रिय होत आहे.
LIC च्या या योजनेत तुम्ही फक्त 200 रुपयांची बचत करून 28 लाख रुपये जमा करू शकता. तुम्ही या योजनेत दिवसाला 200 रुपये म्हणजे महिन्याला 6000 आणि वर्षाला 72 हजार रुपये गुंतवून 20 वर्षांसाठी ही गुंतवणूक चालू ठेवली तर तुम्ही परिपक्वतेच्या वेळी 28 लाख रुपयांचा मोठा निधी जमा करू शकाल.
LIC च्या या योजनेची मुदत किमान 12 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे, ज्यामुळे 12 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही पॉलिसी घेऊ शकतात, जरी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तरी विमा रक्कम, साधा प्रत्यावर्ती बोनस आणि अंतिम बोनस एकत्र जोडून रक्कम नॉमिनीला दिले जाते.