LIC Policy : आजच्या काळात, प्रत्येकासाठी गुंतवणूक करणे फार महत्वाचे झाले आहे. कारण भविष्यात आपल्याला कोणत्या कामासाठी पैशांची गरज भासेल सांगता येत नाही, त्यामुळे आतापासूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे आहे. गुंतवणुकीसाठी सध्या बाजरात अनेक योजना उपलब्ध आहेत. अशातच एलआयसी देखील अनेक बचत योजना चालवत आहे, ज्यात तुम्ही गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठा निधी जमा करू शकता.
आम्ही सध्या LIC कडून ऑफर केल्या जाणाऱ्या जीवन आझाद पॉलिसीबद्दल बोलत आहोत. एलआयसीने जीवन आझाद पॉलिसी अशा प्रकारे तयार केली आहे की ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांना संरक्षण आणि बचत या दोन्हींचा लाभ मिळेल.
जबरदस्त फायदे देणाऱ्या या योजनेत तुम्हाला फक्त 8 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. जर एखाद्याने जीवन आझाद पॉलिसी 20 वर्षांसाठी खरेदी केली असेल, तर पॉलिसीधारकांना 20 वर्षांच्या ऐवजी फक्त 12 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. तर 18 वर्षे जुन्या पॉलिसीसाठी 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.
ही योजना खरेदी केल्यावर, ग्राहक मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक प्रीमियम पेमेंट पर्यायांमधून निवडू शकतात. जर तुम्ही ही योजना खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जीवन आझाद पॉलिसीमध्ये किमान विम्याची रक्कम 2 लाख रुपये आहे आणि कमाल विम्याची रक्कम 5 लाख रुपये आहे.
ही पॉलिसी १५ ते २० वर्षासाठी कोणतीही व्यक्ती खरेदी करू शकते. तसेच ९० दिवस ते ५० वर्षे वयोगटातील कोणीही या योजनेत गुंतवणूक करू शकते. जीवन आझाद पॉलिसीच्या मॅच्युरिटीनंतर गुंतवणूकदारांना हमी परतावा मिळतो आणि ही पॉलिसी घेण्याची वयोमर्यादा बदलत राहते.
समजा ३० वर्षांच्या व्यक्तीने जीवन आझाद योजना १८ वर्षांसाठी घेतली तर दोन लाखांच्या विमा रकमेसाठी पॉलिसीधारकाला १० वर्षांसाठी १२,०३८ रुपये जमा करावे लागतील.