LIC Scheme For Youth:- एलआयसीच्या माध्यमातून अनेक फायद्याच्या अशा पॉलिसीज राबवल्या जातात. एलआयसीच्या अनेक पॉलिसीज किंवा योजना या गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.परंतु विमा कव्हर मिळण्याच्या दृष्टिकोनातून देखील तितक्याच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे भारतामध्ये एलआयसीच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जाते.
पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून देखील एलआयसीच्या योजना फायद्याच्या ठरतात. याच पद्धतीने जर आपण एलआयसीची नुकतीच काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आलेली एक योजना जर बघितली तर
ती तरुण वर्गासाठी अत्यंत फायद्याची योजना असून या योजनेच्या माध्यमातून कंपनी आपल्या ग्राहकांना मुदतीचा विमा लाभ आणि कर्जाच्या परतफेडीपासून संरक्षण देते.ही योजना ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने उपलब्ध आहे.
एलआयसीची ही योजना आहे तरुणांसाठी खास
एलआयसीच्या माध्यमातून कर्ज परतफेडीसाठी मुदत विमा आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी एक नव्हे तर चार नवीन योजना सुरू केल्या असून यामध्ये एलआयसी ने अलीकडेच युवा क्रेडिट लाईफ/ डीजी क्रेडिट लाईफ योजना सुरू केली आहे. जी योजना विशेषतः ज्यांनी कर्ज घेतले आहे किंवा कर्ज घेऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी खास करून सुरू करण्यात आलेली आहे.
एलआयसीच्या या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्दैवाने जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची चिंता दूर करण्याचे महत्त्वपूर्ण काम ही योजना करत असते. ही योजना पूर्णपणे नॉन कॅज्युअल, नॉन लिंक्ड, जीवन, वैयक्तिक तसेच शुद्ध जोखीम योजना आहे.
परंतु पॉलिसी मुदतीसह मृत्यू लाभ मात्र कमी होतो. एलआयसीची युथ टर्म/ डीजे टर्म प्लान हा विमाधारकाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. ही योजना 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोक घेऊ शकतात. परंतु या योजनेचा परिपक्वतेसाठी वयोमर्यादा 33 ते 75 वर्षे आहे. एलआयसीची ही योजना मुदत विमा म्हणजे टर्म इन्शुरन्स नाही.
परंतु कर्जाची जबाबदारी कमी करते. म्हणजे पॉलिसीधारकाने जर कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची रक्कम परतफेड त्या पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला करण्याची गरज राहत नाही. यामध्ये गृहकर्ज असो किंवा एज्युकेशन लोन किंवा कार लोन या सगळ्या प्रकारच्या कर्जाची जबाबदारी पॉलिसीधारकाच्या मृत्यू पश्चात या योजनेच्या माध्यमातून घेतली जाते.
कसे आहेत प्रीमियमचे प्रकार?
या योजनेअंतर्गत चार प्रकारच्या प्रीमियमची सुविधा पुरवली जाते. यामध्ये एकल, पाच वर्षापर्यंतचा प्रीमियम, दहा वर्षापर्यंतचा प्रीमियम आणि पंधरा वर्षापर्यंतचा प्रीमियम यांचा समावेश असेल.
प्रीमियम हा पॉलिसीच्या मुदतीवर आणि तुम्ही किती वर्षे योजना घेतात यावर प्रामुख्याने अवलंबून असतो. यामध्ये सिंगल प्रीमियम सुविधा व्यतिरिक्त प्रीमियम हा वार्षिक किंवा सहामाही आधारावर देखील भरता येतो.
यामध्ये प्रामुख्याने पाच वर्षापर्यंतचा प्रीमियम हा 10 ते 30 वर्षाच्या मुदतीच्या पॉलिसीसाठी असतो. दहा वर्ष पर्यंतचा प्रीमियम हा 15 ते 30 वर्ष मुदतीच्या पॉलिसीसाठी असतो.तर पंधरा वर्षापर्यंतचा प्रीमियम हा 25 ते 30 वर्ष मुदतीच्या पॉलिसीसाठी असतो.
काय आहेत या पॉलिसीचे वैशिष्ट्ये?
1- यामध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर पॉलिसीधारकाने जे काही कर्ज घेतलेले असते त्या कर्जाची परतफेड या पॉलिसीमधून मिळालेल्या रकमेतून केली जाईल आणि कुटुंबातील सदस्य कर्जाच्या रकमेची परतफेड करण्यास जबाबदार राहत नाहीत.
2- जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला नाही आणि पॉलिसीधारकांची पॉलिसीची मुदत संपली तर पॉलिसीधारकाला मात्र कोणतीही रक्कम मिळत नाही. म्हणजे या योजनेचा परिपक्वता लाभ मिळत नाही.
3- जर एखाद्या व्यक्तीने पॉलिसी सरेंडर केली तर पॉलिसीच्या नियमानुसार रक्कम त्याला परत केली जाते.
4- या पॉलिसी अंतर्गत कोणत्याही प्रकारची कर्ज सुविधा मिळत नाही.