FD Interest Rates : एफडी करण्यासाठी सर्वोत्तम व्याजदर देणाऱ्या बँका शोधताय? मग ही बातमी वाचाच…

Published on -

FD Interest Rates : आरबीआयने रेपो दर 2 वर्षांसाठी स्थिर ठेवल्यानंतरही सरकारी आणि खाजगी बँका मुदत ठेवींवरील व्याजदर वाढवत आहेत. बँकांमध्ये ठेवीपेक्षा कर्जाला जास्त मागणी आहे, अशास्थितीत बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा आहे. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी आणि FD कडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, सध्या 6 बँकांनी जुलै 2024 मध्ये आतापर्यंत FD दर 0.10 ते 0.40 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. 

ॲक्सिस बँक

ही खाजगी क्षेत्रातील बँक आता 17-18 महिन्यांच्या कालावधीसाठी 3 कोटी रुपयांच्या FD वर ग्राहकांना 7.20 टक्के व्याज देईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 7.75 टक्के आहे. आता दोन वर्षांच्या कालावधीसाठी FD वर 7.10 टक्के व्याज मिळेल. बँक वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3 ते 7.2 टक्के व्याज देत आहे.

आयसीआयसीआय बँक

1 जुलैपासून, आयसीआयसीआय बँकेच्या मुदत ठेवी दरानेही एफडीवरील व्याजदरांमध्ये बदल लागू केले आहेत. बँक आपल्या ग्राहकांना 15 ते 18 महिन्यांच्या कालावधीसाठी 7.75 टक्के व्याज देईल. आता एका वर्षाच्या ठेवींवर 6.7 टक्के व्याज दिले जाईल. तर 5 वर्षांच्या FD वर तुम्हाला 7.5 टक्के वार्षिक व्याज मिळेल.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

1 जुलैपासून बँक (उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक) आपल्या ग्राहकांना 3 कोटी रुपयांपर्यंतच्या 12 महिन्यांच्या एफडीवर 8.25 व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी या FD वर 8.75 टक्के व्याजदर आहे.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडियाचे नवीन दर (Bank of India FD Rate) फक्त 30 जूनपासून लागू आहेत. हे सर्वसामान्य नागरिकांना 7.80 टक्के वार्षिक व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 666 दिवसांच्या ठेवींवर 7.3 टक्के व्याज देत आहे.

666 दिवसांच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के तर सर्वसामान्यांना 7.3 टक्के व्याज मिळत आहे. बँक 222 दिवसांच्या एफडीवर 6.3 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.15 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. सुधारित व्याजदर 1 जुलैपासूनच लागू होतील.

इंडसइंड बँक

बँक सामान्य ग्राहकांना 15 ते 18 महिन्यांच्या FD वर 7.75 टक्के वार्षिक व्याज आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.25 टक्के वार्षिक व्याज देत आहे. वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3 ते 7.75 टक्के व्याज असते. बँकेचे वाढलेले व्याजदर ३ जुलैपासून लागू होणार आहेत.

पंजाब आणि सिंध बँक

666 दिवसांच्या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 7.80 टक्के तर सर्वसामान्यांना 7.3 टक्के व्याज मिळत आहे. बँक 222 दिवसांच्या एफडीवर 6.3 टक्के, 333 दिवसांच्या एफडीवर 7.15 टक्के आणि 444 दिवसांच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. सुधारित व्याजदर 1 जुलैपासूनच लागू होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe