LPG Gas : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारने आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी पंतप्रधान योजना सुरू केली होती.
या योजनेअंतर्गत देशातील पात्र महिलांना मोफत गॅस कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले. यासोबतच पीएम उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस रिफील करण्यासाठी 300 रुपयांचे अनुदान सुद्धा दिले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा दुसरा टप्पा नुकता सुरू झाला आहे. यांतर्गत आता देशातील 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन मिळणार आहे. यामुळे देशातील एलपीजी गॅस ग्राहकांची संख्या वाढली आहे.
खेड्यापाड्यात सुद्धा आता चुल्ह्याचा वापर कमी झाला आहे. दरम्यान देशातील गॅस ग्राहकांसाठी आता एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे. आता गॅस ग्राहकांना ज्या पद्धतीने सिमकार्ड चेंज केले जाते त्या धर्तीवर गॅस वितरक कंपनी चेंज करता येणार आहे.
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक बोर्ड यासंदर्भात निर्णय घेणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना अगदी सहजतेने आपली गॅस वितरण कंपनी चेंज करता येईल.
गॅस पुरवठादाराची खराब सेवा, डिलिव्हरीला होणारा विलंब किंवा डीलरची मनमानी अशा असंख्य कारणांमुळे त्रस्त असणाऱ्या ग्राहकांना या नव्या सुविधेचा सर्वाधिक फायदा होईल अशी माहिती दिली जात आहे.
यामुळे जर तुम्हाला भविष्यात तुमच्या गॅस कंपनीची सेवा आवडली नाही तर तुम्ही दुसऱ्या कंपनीचा पर्याय निवडू शकणार आहात. सध्याच्या नियमानुसार ग्राहकांना फक्त डीलर्स बदलता येत होते कंपनी बदलता येत नव्हती.
पण आता थेट कंपनीत बदलता येणार असल्याने ग्राहकांना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. स्वतः गॅस कंपनी सुद्धा आपल्या डीलर्स कडे लक्ष देणार आहे.
आता जे नियम आहेत त्यानुसार ग्राहकांना डीलर्स कडून अडचण असेल तर ते त्याच कंपनीच्या दुसऱ्या डीलर कडून गॅस रिफील करू शकतात. पण आता बोर्डाकडून लवकरच हे नियम बदलले जाणार आहेत.
या नव्या नियमांमुळे ग्राहकांना नवीन कनेक्शन न घेता आपल्या सेवेचा पुरवठादार बदलता येणार आहे. आता एखाद्या डीलर कडे जर गॅस उपलब्ध नसेल तर अशावेळी ग्राहक दुसऱ्या कोणत्याही कंपनीच्या डीलर कडून गॅस रिफील करू शकतील.