Government Schemes : महाराष्ट्र सरकार महिलांना देणार दर महिना 1500 रुपये, असा घ्या ‘या’ खास योजनेचा लाभ!

Ahmednagarlive24 office
Published:
Government Schemes

Mukhyamantri Majhi Ladki Bahin : महिलांना सक्षम बनवण्यासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना राबवत असते, दरम्यान, महाराष्ट्र्र सरकार सध्या अशीच एक योजना राबवत आहे, ज्यांतर्गत महिलांना दरमहा 1,500 चा मासिक भत्ता दिला जाणार आहे, सरकाराच्या या योजनेचे नाव ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे आहे.

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये राज्य शासनाकडून राबवण्यात येणार असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, जुलै 2024 पासून राज्यातील 21 ते 60 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना 1,500 चा मासिक भत्ता दिला जाईल.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मध्य प्रदेशातील यशस्वी ‘लाडली बहन’ योजनेपासून प्रेरित असल्याचे दिसते. मध्य प्रदेश सरकार महिलांच्या खात्यात मासिक 1,250 जमा करते, हे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुरू केलेले पाऊल आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले आहेत. 2023 मधील राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लेक लाडकी’ योजनेचा समावेश होता, ज्याचा लाभ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांना त्यांच्या मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आली होती.

याशिवाय, 2023-24 च्या अर्थसंकल्पात राज्य परिवहन बसमध्ये महिलांसाठी 50 टक्के प्रवास सवलत जाहीर करण्यात आली होती. मार्च 2024 मध्ये, शिंदे सरकारने आपले चौथे महिला धोरण आणले, जे आठ प्रमुख उद्दिष्टांवर केंद्रित होते. हे धोरण महिलांचे आरोग्य, शिक्षण, लिंग-आधारित हिंसाचार संपवणे आणि महिलांमधील राजकीय सहभागाला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करते. आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन’ योजना महाराष्ट्र सरकारच्या राज्यभरातील महिलांचे कल्याण आणि सक्षमीकरण वाढविण्यासाठी केलेल्या नवीन प्रयत्नांवर प्रकाश टाकते.

लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे?

-या योजनेचा लाभ 21 वर्षांपासून 60 वर्षांपर्यत मिळेल.

-अर्ज करण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणं आवश्यक आहे.

-या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे राष्ट्रीय बँक खाते असणे आवश्यक आहे.

-तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावं.

असा करा अर्ज?

-योजनेच्या लाभासाठी पोर्टल/ मोबाईल अॅपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल.

आवशक कागदपत्रे?

-यासाठी लाभार्थ्यांचं आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

-तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असणे आवश्यक आहे.

-सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापर्यंत असणं अनिवार्क (5) बँक खातं
पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी)

-पासपोर्ट आकाराचा फोटो

-रेशनकार्ड

-सदर योजनेच्या अटी-शर्तीचे पालन करण्याबाबतचं हमीपत्र

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe