Mahindra Car:- केंद्र सरकारच्या माध्यमातून जीएसटी सुधारणा 2025 अंतर्गत अनेक महत्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत व या बदलांमुळे अनेक जीवनावश्यक वस्तू देखील स्वस्त होण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या काही वाहनाच्या किमती देखील यामुळे कमी झालेले आहेत. नुकतेच टाटा मोटर्सने त्यांच्या काही वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणा केली व त्यापाठोपाठ महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने देखील संपूर्ण आयसीई एसयुव्ही पोर्टफोलिओच्या किमतीत बदल केलेला असून या नवीन किमती 6 सप्टेंबर 2025 लागू करण्यात आलेले आहेत.
कोणत्या कारच्या किमतीमध्ये किती करण्यात आला बदल?
यामुळे महिंद्रा अँड महिंद्रा च्या सर्वात लोकप्रिय असलेल्या थार, स्कॉर्पिओ, बोलेरो तसेच XUV700 आणि स्कॉर्पिओ एन कारच्या किमतीमध्ये कपात करण्यात आलेली असून या कार पूर्वीपेक्षा एक लाख एक हजार रुपयांनी स्वस्त झालेले आहेत. याबाबत कंपनीने माहिती देताना म्हटले आहे की,बोलेरो आणि बोलेरो निओ या गाड्या 1.27 लाख रुपयांपर्यंत स्वस्त झालेले आहेत. इतकेच नाही तर XUV3XO पेट्रोल व्हेरियंटमध्ये ग्राहकांना 1.40 लाख रुपयांची बचत करता येणार आहे व XUV3XO डिझेल व्हेरियंटमध्ये कमाल 1.56 लाख रुपयांची कपात झालेली आहे. त्यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या माध्यमातून थार 2WD डिझेलवर 1.35 लाख तर थार 4WD डिझेल आणि स्कॉर्पिओ क्लासिक मॉडेलवर 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळणार आहे. इतकेच नाहीतर स्कॉर्पिओ एन आता 1.45 लाख रुपयांनी स्वस्त झाली आहे तर थार रॉक्सची किंमत 1.33 लाख रुपयांनी कमी करण्यात आलेली आहे. तसेच महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे एक्सयूव्ही700 या लोकप्रिय मॉडेलची किंमत देखील 1.43 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
