महिंद्रा कंपनी महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 1500 एकरावर उभारणार सर्वात मोठी कंपनी, 150000000000 रुपयांच्या महागुंतवणूकीची घोषणा

Published on -

Mahindra Invest In Maharashtra : महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर आणखी एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट पाहायला मिळणार आहे. राज्याच्या औद्योगिक नकाशात आणखी एका भव्य प्रकल्पाची भर पडणार आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने महाराष्ट्रात महा गुंतवणुकीची घोषणा केली असून या नव्या गुंतवणुकीमुळे राज्यात हजारो हातांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराचा लाभ मिळणार आहे.

कंपनीच्या या घोषणेनंतर राज्यातील तरुण वर्गात मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महिंद्रा समूहाने राज्याच्या विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

यातील सर्वात मोठी गुंतवणूक ही विदर्भात राहणार आहे आणि या गुंतवणुकीतून विदर्भात असंख्य लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या गुंतवणुकीद्वारे थेट हजारो रोजगारांची निर्मिती होईल तर अप्रत्यक्षरीत्या लाखो लोकांना कमाईचे साधन मिळणार आहे. 

पंधराशे एकर जमिनीवर उभारणार प्रकल्प 

महिंद्रा समूहाने विदर्भातील नागपूर जिल्ह्यात तब्बल 1500 एकर जागेवर आपला देशातील सर्वात मोठा वाहन आणि ट्रॅक्टर उत्पादन प्रकल्प उभारण्याची मोठी घोषणा केली आहे.

कंपनीच्या माध्यमातून पुढील एका दशकात अर्थात पुढील 10 वर्षांत 150000000000 रुपये म्हणजे 15 हजार कोटी रुपये इतकी भरीव गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे विदर्भाच्या आर्थिक भविष्यास नवी दिशा मिळणार आहे.

आत्महत्याग्रस्त विदर्भ आता उद्योगांचे हब  

मागासलेला विदर्भ आता उद्योगांचे हब म्हणून ओळखला जाईल अशी आशा या गुंतवणुकीमुळे बळावली आहे. हा प्रांत आता उद्योगांच्या केंद्रस्थानी येऊ लागला आहे.

समृद्धी महामार्ग, रेल्वे कनेक्टिव्हिटी, मध्य भारतातील भौगोलिक स्थान आणि वाढते औद्योगिक वातावरण या साऱ्या पोषक वातावरणामुळे विदर्भ उद्योगांसाठी अधिक किफायतशीर ठरण्याची आशा आहे.

यामुळे विदर्भात दिवसेंदिवस गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. महिंद्रा कंपनीने देखील या सगळ्याचा विचार करून आपला सर्वात मोठा प्रकल्प उभारण्यासाठी नागपूर जिल्ह्याची निवड केली आहे.

हा कारखाना केवळ महिंद्रासाठी नाही, तर संपूर्ण परिसरासाठी विकासाचे नवे दालन उघडणारा ठरणार असा विश्वास यावेळी औद्योगिक क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

संभाजीनगरमध्ये पुरवठादार पार्क

विदर्भाप्रमाणेच मराठवाड्याला देखील एक मोठी भेट मिळाली आहे. नागपूरमधील मुख्य प्रकल्पासोबतच मराठवाडा प्रांतातील छत्रपती संभाजीनगरमध्ये 150 एकरवर ‘सप्लायर पार्क’ उभारण्यात येणार आहे.

येथून नागपूरच्या नव्या कारखान्याला तसेच चाकण आणि नाशिकमधील महिंद्राच्या विद्यमान युनिट्सना आवश्यक पार्ट्स पुरवले जाणार आहेत. यामुळे स्थानिक लघुउद्योग, एमएसएमई आणि पुरवठा साखळीला मोठा हातभार लागणार आहे.

त्यांना संभाजीनगर मध्ये जे सप्लायर पार्क तयार होणार आहे यामुळे सुद्धा येथील स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची आशा आहे.

2028 पासून उत्पादन, हजारो रोजगार

महिंद्राच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात 2028 पासून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत झाल्यानंतर नागपूर प्लांटमधून दरवर्षी 5 लाखांहून अधिक वाहने आणि 1 लाख ट्रॅक्टर तयार होतील.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

EV ते भविष्यातील SUV पर्यंत सर्व काही

हा कारखाना केवळ पारंपरिक वाहनांपुरता मर्यादित राहणार नाही. येथे ICE, इलेक्ट्रिक वाहने (EV) आणि भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित गाड्यांचे उत्पादन होणार आहे.

महिंद्राच्या नव्या NU_IQ आर्किटेक्चरवरील SUV प्लॅटफॉर्मसाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. देशांतर्गतच नव्हे तर निर्यात बाजारपेठेसाठीही येथून वाहने तयार केली जातील.

स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ

महिंद्राची ही गुंतवणूक म्हणजे केवळ आकड्यांचा खेळ नाही, तर विदर्भातील शेतकरी कुटुंबातील युवक, स्थानिक उद्योजक, ट्रान्सपोर्टर्स आणि सेवा क्षेत्रासाठी नवी आशा आहे.

प्रगत ऑटोमेशन, डिजिटल उत्पादन प्रणाली आणि मजबूत लॉजिस्टिक्समुळे हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक यशोगाथेत एक सुवर्णअध्याय ठरणार आहे.

एकेकाळी रोजगारासाठी स्थलांतर करणारा विदर्भ, आता रोजगार देणारा प्रदेश म्हणून ओळखला जाण्याच्या दिशेने महिंद्राच्या या ‘महागुंतवणुकीमुळे’ ठोस पाऊल पुढे टाकत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News