‘या’ बँकांमध्ये 1 वर्षासाठी एफडी करा आणि भरपूर पैसा मिळवा! जाणून घ्या कोणती बँक देते जास्त परतावा?

एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा खूप परंपरागत असा गुंतवणुकीचा प्रकार असून गेले किती वर्षापासून गुंतवणूकदार या गुंतवणूक पर्यायाला पसंती देताना आपल्याला दिसून येतात. त्यामधील दोन प्रमुख कारणे म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.

Ratnakar Ashok Patil
Published:
fixed deposit

Bank FD Interest Rate:- एफडी म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा खूप परंपरागत असा गुंतवणुकीचा प्रकार असून गेले किती वर्षापासून गुंतवणूकदार या गुंतवणूक पर्यायाला पसंती देताना आपल्याला दिसून येतात. त्यामधील दोन प्रमुख कारणे म्हणजे यामध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते आणि मिळणारा परतावा देखील चांगला मिळतो.

आपल्याला माहित आहे की देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व आकर्षक व्याजदर देखील ऑफर करतात. परंतु फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी योजनांच्या माध्यमातून मिळणारा जो काही व्याजदर आहे तो तुम्ही किती कालावधीसाठी एफडी करत आहात? यावर प्रामुख्याने अवलंबून असतो.

तुम्ही एक वर्ष ते पाच वर्ष अशा कालावधीसाठी एफडी करू शकतात व यावर वेगवेगळ्या पद्धतीचा व्याजदर मिळवू शकतात. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सामान्य ग्राहकांना वेगळा व्याजदर मिळतो तर ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर दिला जातो.

या अनुषंगाने तुम्हाला देखील जर या वर्षात एफडी करायची असेल व त्या माध्यमातून चांगला परतावा मिळवायचा असेल तर या लेखामध्ये आपण काही स्मॉल फायनान्स बँकांची माहिती घेणार आहोत जे एक वर्ष कालावधी म्हणजेच 365 दिवसांच्या एफडीवर चांगला परतावा देतात.

365 दिवस म्हणजेच एक वर्षाच्या एफडीवर या बँका देतात सर्वाधिक परतावा

1- सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक- एक वर्षाच्या एफडीवर जास्तीत जास्त परतावा देण्याच्या दृष्टिकोनातून सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या एफडी योजना खूप फायद्याच्या आहेत. या बँकेमध्ये जर एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी केली तर वार्षिक आधारावर 8.05% पर्यंत व्याज हे बँकेच्या माध्यमातून दिले जाते.

2- उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक- तुम्हाला जर 365 दिवस म्हणजेच एक वर्षाच्या कालावधी करिता एफडी करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचा पर्याय देखील फायद्याचा ठरेल.

365 दिवसांच्या एफडीवर या बँकेच्या माध्यमातून 8.25 टक्के दराने व्याजदर मिळतो. देशातील स्मॉल फायनान्स बँकांपैकी सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांपैकी ही एक बँक आहे.

3- इक्विटास स्मॉल फायनान्स बँक- या स्मॉल फायनान्स बँकेमध्ये जर तुम्ही एक वर्ष म्हणजेच 365 दिवसांच्या कालावधी करिता एफडी केली तर ही बँक 8.10 टक्के दराने परतावा देते. त्यामुळे एक वर्ष कालावधीच्या एफडीतून चांगला परता मिळवण्याचा दृष्टिकोनातून ही बँक देखील महत्त्वाची आहे.

4- जना स्मॉल फायनान्स बँक- 365 दिवसांच्या एफडीमधून जर तुम्हाला सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल तर जना स्मॉल बँकेत एफडी करून तुम्हाला फायदा मिळू शकतो.

या स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना एफडीतील गुंतवणुकीवर 8.24 टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो. त्यामुळे या नवीन वर्षात तुम्ही एक वर्षाची एफडी करून सर्वात जास्त परतावा या माध्यमातून मिळवू शकतात.

5- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक- उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या माध्यमातून देखील 365 दिवसांच्या एफडीवर चांगला परतावा मिळतो. या स्मॉल फायनान्स बँकेत जर एक वर्ष कालावधी करिता एफडी केली तर ही बँक ग्राहकांना आठ टक्के दराने व्याजदर देते.

या पाचही स्मॉल बँकेचा तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास केला तर उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक 8.25 टक्के दराने व्याजदर देते व चांगला परतावा या बँकेच्या एफडीतून ग्राहकांना मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe