कधीही आणि कुठेही करा पेमेंट! UPI Lite ने आणला इंटरनेट शिवाय व्यवहार करण्याचा नवा फंडा

Karuna Gaikwad
Published:

Benifit Of UPI Lite:आजच्या डिजिटल युगात रोख पैशांशिवाय व्यवहार करणे सामान्य झाले आहे. UPIच्या मदतीने कोणतेही पेमेंट सहज करता येते. त्यामुळे पाकीट घेऊन जाण्याची गरजही भासत नाही. मात्र जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर पेमेंट कसे करणार? यावर उपाय म्हणून UPI Lite सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यामुळे तुम्ही इंटरनेटशिवायही पेमेंट करू शकता.

कधी सुरू करण्यात आली ही सेवा?

UPI Lite सेवा 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती. जे डिजिटल पेमेंट अधिक सोपे आणि जलद बनवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. सुरुवातीला UPI Lite वॉलेटची मर्यादा 1000 होती. परंतु आता ती वाढवून 5000 करण्यात आली आहे. तथापि एका वेळी तुम्ही जास्तीत जास्त 1000 चा व्यवहार करू शकता. ही सुविधा मुख्यतः लहान व्यवहारांसाठी उपयुक्त ठरते. जसे की, किराणा माल खरेदी, चहा-कॉफी, टोल पेमेंट किंवा प्रवासाचा भाडा भरण्यासाठी UPI Lite चा सहज उपयोग करता येतो.

यूपीआय लाईटचा वापर कसा करता येतो?

UPI Lite ही UPIची हलकी आणि वेगवान आवृत्ती आहे.जी विशेषतः लहान आणि जलद पेमेंटसाठी डिझाइन केली गेली आहे. ज्या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी कमजोर आहे.तिथेही UPI Lite चा उपयोग सहज करता येतो. विशेष म्हणजे इंटरनेटशिवायही व्यवहार होतो. ज्यामुळे पेमेंट करण्यासाठी नेटवर्क समस्या अडथळा ठरत नाही. याशिवाय UPI Lite द्वारे व्यवहार करताना वारंवार OTP किंवा PIN टाकण्याची गरज भासत नाही.ज्यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होते.

UPI Lite च्या मोठ्या फायद्यांपैकी एक म्हणजे ते मोबाइल नोटिफिकेशन कमी करते. सामान्यतः UPI पेमेंट करताना वारंवार नोटिफिकेशन आणि अलर्ट येतात. परंतु UPI Lite मध्ये हे प्रमाण कमी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना सततच्या नोटिफिकेशनचा त्रास होत नाही. शिवाय हे सुरक्षित असून कोणत्याही अतिरिक्त प्रमाणीकरणाशिवाय व्यवहार करता येतो. त्यामुळे इंटरनेट नसतानाही लहान खर्च आणि दैनंदिन व्यवहार सहज करता येतात.

UPI Lite हे डिजिटल इंडियाला वेग देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला कॅशलेस व्यवहाराकडे वळवण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी जिथे नेटवर्क समस्या असते. तिथे UPI Lite सुविधाजनक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराचा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही UPI Lite चा वापर केला नसेल तर आजच तो सक्रिय करा आणि इंटरनेटशिवाय पेमेंट करण्याचा अनुभव घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe