Business Idea : केळीपासून बनवा पावडर ! हा बिझनेस नाही आहे पैशांचं मशीन..खूप कमाई कराल

Ahmednagarlive24 office
Published:
Business Idea

केळी हे फळ बारमाही उपलब्ध होणारे फळ आहे. याचे आरोग्यास खूप फायदे आहेत. केळीमध्ये प्रोटीन, जीवनस्तके, खनिजे आदी विपुल प्रमाणात असतात. अनेकांच्या डाईट प्लॅनमध्ये केलीच समावेश असतोच. केळीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. अनेक समस्यांत केळी हे रामबाण उपाय मानले जाते. तुम्ही या केळीपासून पावडर बनवण्याचा व्यवसाय करू शकता. या पावडर प्रचंड मागणी आहे.

केळीपासून तयार होणारी पावडर हा रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी रामबाण उपाय मानला जातो. तसेच माणसाची पचनशक्ती मजबूत होण्यास मदत होते. त्यामुळे या पॉवडरला मोठी डिमांड आहे. त्यामुळे तुम्ही हा बिझनेस करून खूप पैसे कमाऊ शकता. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊयात –

किती भांडवल लागेल?

केळी पावडरच्या व्यवसाय तुम्ही 10 ते 15 हजार रुपये गुंतवणून सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला काही मशिन्स लागतील. ते तुम्हाला परवडेबल किमतीत ऑनलाइन आणि ऑफलाइन देखील मिळतील. Banana Dryer Machine, Mixture Machine आदी मशीन तुम्हाला लागतील.

अशी तयार केली जाते पावडर

आता विषय आहे केळी पासून पावडर कशी बनवायची याचा. सुरवातीला सोडियम हायपोक्लोराईट द्रावणाने केळी स्वच्छ करा. त्यानंतर केली सोलून काढा व सायट्रिक ऍसिडच्या द्रावणात 5 मिनिटे भिजवा. नंतर फळांचे लहान तुकडे करा. हे तुकडे 60 अंश सेल्सिअस तापमानात हॉट एयर ओव्हनमध्ये 24 तास सुकण्यासाठी ठेवा.त्यानंतर ते कुटून घ्या. झाली तुमची पॉवडर तयार. त्यानंतर छान पॅकेजिंग करा.

किती करू शकाल इन्कम

आता यातून होणार इन्कम पाहिला तर तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. तुमची गुंतवणूक, तुमचे मार्केटिंग यावर तुमचा इन्कम अवलंबून आहे. बाजारात केळीची पावडर साधारण 800 ते 1000 रुपये किलो दराने विकली जाते. जर तुम्ही दररोज 5 किलो केळीची पावडर तयार केली तर तुम्हाला दररोज 3 हजार ते 4 हजार रुपयांचा नफा सहज मिळू शकतो. म्हणजेच तुम्ही दरमहा एक लाख रुपये कमवाल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe