Small Business Idea : कापसापासून बनवा ‘हे’ प्रॉडक्ट, प्रत्येक घरात आहे मोठी मागणी, महिन्याकाठी होणार 15 लाखांपर्यंतची कमाई !

Published on -

Small Business Idea : जर तुम्हीही अतिरिक्त उत्पन्न कमावण्यासाठी व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. कारण की, आज आपण एका भन्नाट बिजनेस आयडिया जाणून घेणार आहोत. आज आपण कॉटन बड्स मेकिंग बिझनेस संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. खरंतर, अलीकडे कॉटन बड्सचा वापर प्रत्येक घरात होऊ लागला आहे.

कान साफ करण्यासाठी कॉटन बड्स वापरले जाते. याशिवाय मेडिकलच्या फिल्डमध्ये देखील याचा मोठा वापर होतो. परिणामी कॉटन बड्सला बाजारात मोठी मागणी आहे. म्हणून जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर कॉटन बड्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आता आपण या व्यवसायाबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

किती गुंतवणूक करावी लागणार बरं?

खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे KVIC ने या बिझनेस बाबत एक प्रकल्प अहवाल बनवला आहे. सदर अहवालावर विश्वास ठेवला तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास 25 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करावी लागू शकते. पण जर तुमच्याकडे एवढे भांडवल नसेल तर तुम्ही यासाठी कर्ज देखील काढू शकता.

तुम्ही 2.49 लाख रुपये स्वत:चे योगदान टाकून आणि उर्वरित रक्कम कर्ज स्वरूपात उभारून हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात. व्यवसाय सुरू झाल्यानंतर पाचव्या वर्षी तुम्ही 14.49 लाख रुपयांपर्यंत निव्वळ नफ्याची अपेक्षा करू शकता.

1500 स्क्वेअर फुट जागा लागणार

मीडिया रिपोर्ट नुसार, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जवळपास एक हजार 500 स्क्वेअर फुट जागा लागू शकते. जागा स्वतःची असेल तर उत्तम नाही तर तुम्हाला यासाठी भाड्याची जमीन घ्यावी लागणार आहे. तुम्हाला या जमिनीवर जवळपास एक हजार स्क्वेअर फिट चे शेड तयार करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला अडीच लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागू शकते. यासाठी तुम्हाला काही मशिनरी देखील लागतील.

जर तुम्ही ऑटोमॅटिक प्लांट आणि मशिनरी खरेदी करणार असाल तर 15 लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक करावी लागणार आहे. फर्निचर आणि फिक्स्चरसाठी 75,000 रु लागतील. तसेच हा व्यवसाय चालवण्यासाठी वर्किंग कॅपिटल म्हणजेच कार्यरत भांडवल म्हणून 6.67 लाख रुपये लागतील. असे तुम्ही एकूण 24.97 लाख रुपयांच्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात.

किती कमाई होणार बर

कॉटन स्वॅब्स किंवा कॉटन बड्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर पाच वर्षांच्या अंदाजे नफ्याचा तपशील देणारा KVIC व्यवहार्यता अहवाल सांगतो की, पहिल्या वर्षी तुम्हाला 2.92 लाख रुपये, दुसऱ्या वर्षी 5.88 लाख रुपये, तिसऱ्या वर्षी 8.88 लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो. तसेच चौथ्या वर्षी 11.70 लाख रुपये आणि पाचव्या वर्षी 14.49 लाख रुपये एवढा नफा मिळणार असे बोलले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe