Mutual Fund SIP:- सध्याच्या काळात योग्य आणि स्मार्ट गुंतवणूक केल्यास भविष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ शकते. नोकरी असो किंवा छोटा व्यवसाय योग्य नियोजन केल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकता. गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस योजनांपासून ते शेअर बाजारापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र योग्य पर्याय निवडणे गरजेचे आहे.
SIP बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असेल जो आज सर्वात लोकप्रिय गुंतवणूक मार्ग आहे. पण तुम्ही कधी SWP (Systematic Withdrawal Plan) बद्दल ऐकले आहे का? हा गुंतवणुकीचा एक असाच प्रभावी पर्याय आहे. जो तुम्हाला निवृत्तीनंतर देखील नियमित उत्पन्न मिळवून देतो.
SIP आणि SWP म्हणजे काय?
निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य हवे असेल तर लवकर गुंतवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. SIP आणि SWP हे निवृत्ती नियोजनासाठीचे दोन स्मार्ट पर्याय आहेत.
SIP (Systematic Investment Plan) – यामध्ये तुम्ही नियमितपणे म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करता येते.दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुमचे भांडवल वाढत जाते आणि मोठी संपत्ती निर्माण होते.
SWP (Systematic Withdrawal Plan) – यामध्ये तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून दरमहा ठराविक रक्कम काढू शकता. यामुळे निवृत्तीनंतरही तुम्हाला मासिक उत्पन्न मिळत राहत. तसेच उर्वरित रक्कम गुंतवणुकीत राहून वाढत जाते.
SWP कशी फायदेशीर ठरते?
नोकरीवरून निवृत्त झाल्यानंतर मासिक उत्पन्नाची चिंता सर्वांनाच असते. SWP हा पर्याय अशा वेळी अत्यंत उपयुक्त ठरतो. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
नियमित उत्पन्नाचा स्रोत – तुम्ही दरमहा एक ठराविक रक्कम काढू शकता, जी तुमच्या गरजेनुसार ठरवता येते.
गुंतवणूक सतत वाढत राहते – तुम्ही काढलेल्या पैशांव्यतिरिक्त बाकीची गुंतवणूक वाढतच राहते, ज्यामुळे दीर्घकालीन फायदा होतो.
मंदीच्या काळातही फायदा – बाजार तेजीत असताना तुम्ही कमी युनिट्स विकता, ज्यामुळे जोखीम कमी होते.
SWP ची सुरुवात कशी करावी?
SWP मध्ये लवचिकता असते. तुम्ही इक्विटी, हायब्रिड किंवा डेट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता. मात्र, कमी जोखमीसाठी डेट फंड किंवा कंझर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड हा उत्तम पर्याय आहे. बाजारातील चढ-उतारांची तफावत लक्षात घेऊन योग्य वेळी SWP सेट केल्यास अधिक फायदा मिळू शकतो.
२० वर्षांचे गणित –SIP चांगली की SWP
जर तुम्ही २० वर्षांसाठी दरमहा 14,000 SIP मध्ये गुंतवणूक केली आणि १२% वार्षिक परतावा मिळाला तर एकूण गुंतवणूक 33.60 लाख रुपये होते आणि
भांडवली नफा 1.06 कोटी रुपये मिळून
एकूण निधी 1.39 कोटी रुपये मिळतो.
यानंतर तुम्ही SWP सुरू करून दरमहा 1.07 लाख काढू शकता. जर तुम्ही ७% वार्षिक परताव्यावर हा निधी गुंतवला तर २० वर्षांत तुम्ही एकूण 2.77 कोटी विथड्रॉ करू शकता आणि तरीही शेवटी 1.67 लाख उरतील.