Mhada Lottery 2025:- तुम्हाला पुण्यामध्ये घर घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी असून या बातमी मागील प्रमुख कारण म्हणजे म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून एकूण 4186 घरांसाठी सोडत जाहीर करण्यात आलेली आहे. या एकूण घरांमध्ये पुण्यातील 15% एकात्मिक योजनेसह 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील घरांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या सोडतीसाठी आवश्यक असलेली नोंदणी तसेच अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 11 सप्टेंबर 2025 वार गुरुवारपासून सुरुवात करण्यात आलेली आहे व यातील अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया 1 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे व याची सोडत 21 नोव्हेंबरला बारा वाजता काढली जाणार आहे.

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या माध्यमातून 4186 घरांसाठी सोडत
पुणे मंडळाच्या माध्यमातून पुणे विभागातील घरांसाठी 2024 मध्ये सोडत काढण्यात आलेली होती. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वावरील जे 299 घरे आहेत त्यांच्यासोबत म्हाडा गृहनिर्माण योजनेतील 1683 घरांसाठी अर्ज विक्री तसेच स्वीकृती प्रक्रिया सुरूच आहे. त्यातच आता पुणे मंडळाने गुरुवारी 20 टक्के आणि पंधरा टक्के योजनेतील साधारणपणे 4186 घरांच्या सोडती करिता जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.
या एकूण घरांमध्ये एकात्मिक गृहनिर्माण योजनेतील पंधरा टक्के म्हणजेच 864 घरांचा समावेश आहे आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 3322 घरांचा समावेश असून अशी एकूण 4186 घरांचा या सोडतीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. या सोडती साठी संगणकीय पद्धतीने अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबर 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. अनामत रक्कम भरण्याची मुदत 1 नोव्हेंबर पर्यंत बँकांच्या कार्यालयीन वेळेत असणार आहे.
जेव्हा अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया संपेल त्यानंतर 11 नोव्हेंबरला स्वीकृत केलेल्या अर्जांची प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे तर 17 नोव्हेंबरला पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध होईल व 21 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता या घरांच्या सोडतीचा निकाल प्रसिद्ध होणार असून सायंकाळी सहा वाजता जे विजेते ठरतील त्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 15% एकात्मिक योजनेतील घरांची किंमत 13 लाख 66 हजार ते 30 लाखांच्या दरम्यान असून 20% सर्वसमावेशक योजनेतील घरे अल्प गटासाठी आहेत व या घरांच्या किमती 13 लाखापासून ते 38 लाखांच्या दरम्यान आहेत.