Minimum Balance in Account : अलीकडच्या काळात जवळपास सर्वांचे बँकेत खाते आहे. बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक सुविधा आणत असते. जर तुमचे बँकेत खाते असेल तर तुम्हाला बँकेच्या सर्व नियमांची माहिती असावी. नाहीतर तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
अशातच जर तुमचे SBI, PNB आणि HDFC बँकेत खाते असेल इकडं लक्ष द्या. या बँकांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे. नाहीतर तुम्हाला देखील खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. कसे ते जाणून घ्या.

बचत खात्यासाठी कमीत कमी शिल्लक
बँकांकडे एक विशिष्ट कमीत कमी शिल्लक मर्यादा असते जी खातेधारकाने राखायला हवी. जर तुम्ही कमीत कमी शिल्लक ठेवली नाही तर तुमच्याकडून बँक शुल्क आकारते.. कमीत कमी शिल्लक मर्यादा बँकेनुसार वेगळी असते. तसेच ती बँकेच्या स्थानावर देखील अवलंबून असते.
शून्य शिल्लक बचत खाते
वाढत्या मागणीमुळे आणि शुल्क टाळण्यासाठी बँक खात्यात हजारो ठेवण्याच्या पारंपारिक पद्धतीच्या विरोधात, अनेक बँका आता शून्य शिल्लक बचत खाती ऑफर करत आहेत. बँक ऑफ बडोदाच्या वेबसाइटनुसार, ‘झिरो बॅलन्स सेव्हिंग खातेधारकांना कमीत कमी शिल्लक न ठेवता खाते चालवता येते.
जाणून घ्या SBI कमीत कमी शिल्लक
हे लक्षात घ्या की मार्च 2020 मध्ये, SBI ने त्याच्या मूळ बचत खात्यांमधून सरासरी मासिक शिल्लक (AMB) आवश्यकता काढून टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, बँकेच्या खातेधारकांना त्यांच्या खात्यात सरासरी मासिक शिल्लक रु. 3,000, रु. 2,000 किंवा रु. 1,000 ठेवावी लागत होती.
पीएनबी बँक कमीत कमी शिल्लक
पीएनबी बँकेच्या ग्राहकांची सरासरी मासिक शिल्लक ग्रामीण ग्राहकांसाठी 1000 रुपये, निमशहरी ग्राहकांसाठी 2000 रुपये, शहरी आणि मेट्रो ग्राहकांसाठी 5000 रुपये आणि 10,000 रुपये आहे. जर कमीत कमी शिल्लक ठेवली नाही तर ग्रामीण आणि निमशहरी ग्राहकांना 400 रुपये आणि मेट्रो आणि शहरी ग्राहकांसाठी 600 रुपये शुल्क भरावे लागते.
एचडीएफसी बँक कमीत कमी शिल्लक
या बँकेच्या ग्राहकांना गेल्या महिन्यात खात्यात असणाऱ्या एएमबीच्या आधारे चालू महिन्यात सेवा आणि व्यवहार शुल्क भरावे लागणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, ‘शहरी शाखांसाठी कमीत कमी सरासरी मासिक शिल्लक 10,000 रुपये किंवा 1 लाख रुपयांची मुदत ठेव किमान 1 वर्ष 1 दिवस (1 जुलै 22 पासून) राखणे बंधनकारक असणार आहे.निमशहरी शाखांसाठी कमीत कमी 1 वर्ष 1 दिवस (1 जुलै 2022 पासून) आणि ग्रामीण शाखांसाठी 1 वर्ष 1 दिवस (1 जुलै 2022 पासून) 5000 रुपयांची सरासरी मासिक शिल्लक किंवा 50,000 रुपयांची मुदत ठेव गरजेची असणार आहे. या कालावधीसाठी 2500 रुपयांची सरासरी तिमाही शिल्लक किंवा 25,000 एचडीएफसी मुदत ठेव ठेवा.