दिवाळीत पैसे झाले डबल , ‘या’ पाच शेअर्सने अवघ्या एकाच महिन्यात केले मालामाल

Ahilyanagarlive24 office
Published:

Share Market : आजचा आर्थिक दृष्ट्या सजग झालेला युवक गुंतवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबवतो. आज अनेक तरुण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत आहेत. त्यात आज दिवाळी. दिवाळीचा मुहूर्त अनेकांना धार्जिणे असतो असे म्हणतात.

जे सातत्याने शेअरमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी ही दिवाळी खूप शुभ आहे. त्याचे कारण असे की असे काही शेअर्स आहेत कि ज्यांनी गुंतवणूकदारांना एका महिण्यात दुप्पट रक्कम दिली आहे तेही या दिवाळीच्या दिवसांत.

विशेष म्हणजे यातील अनेक शेअर्स असे आहेत की ज्यांच्या किंमत अजूनही कमी आहेत. त्यात तुम्हीही गुंतवणूक करू शकता. चला जाणून घेऊयात –

Trishakti Electr : महिनाभरापूर्वी Trishakti Electr च्या शेअरची किंमत 52.53 रुपये होती. या शेअरची किंमत आता 105.26 रुपये झाली आहे. एका महिन्यात या शेअरने 100.38 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 2 लाख रुपये झाले असते.

Integra Switchgear : साधारण महिनाभरापूर्वी इंटिग्रा स्विचगिअरच्या शेअरची किंमत 6.6 रुपये होती. या शेअरची किंमत आता 14.81 रुपये झाली आहे. त्यामुळे एका महिन्यात या शेअरने 123.38 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 2 लाख 23 हजार रुपये झाले असते.

Skyline Millars : महिनाभरापूर्वी हा शेअर्स 9.01 रुपयांवर होता. या शेअरची किंमत आता 19.76 रुपये झाली आहे. एका महिन्यात या शेअरने जवळपास 119.31 टक्के परतावा मिळाला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य आज 2 लाख 19 हजार रुपये झाले असते.

Sical Logistics : महिनाभरापूर्वी Sical Logistics या शेअरची किंमत 109.27 रुपये होती. हा शेअर आता 277.55 रुपयांवर ट्रेड करतोय. त्यामुळे एका महिन्यात या शेअरने 154 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 2 लाख रुपये 54 हजार झाली असती.

Alacrity Securities : एक महिन्यापूर्वी हा शेअर 12.65 रुपये होता. या शेअरची किंमत आता 26.74 रुपये झाली आहे. अशा प्रकारे शेअरने एका महिन्यात 111.38 टक्के परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याचे मूल्य 2 लाख 11 हजार रुपये झाले असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe