UPI Transaction:- सध्या मोठ्या प्रमाणावर यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. अगदी दोन पाच रुपयाच्या एखादया वस्तूची खरेदी करायची असेल तरी देखील यूपीआयच्या माध्यमातून पेमेंट केले जाते. यामध्ये मोबाईल नंबरचा वापर करून किंवा क्यूआर कोड स्कॅन केला जातो व पटकन आपल्याला पैसे पाठवता येतात. परंतु बऱ्याचदा मोबाईल नंबर वापरून जेव्हा आपण यूपीआय पेमेंट करतो तेव्हा चुकीचा नंबर टाकला जातो व दुसऱ्याच्या खात्यात पैसे चालले जातात. अशावेळी खूप मोठा मानसिक ताण येतो व आपल्या मनात प्रश्न येतो की आता हे पैसे परत मिळतील का? तर याचे उत्तर हो मध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीने चुकीच्या खात्यावर पैसे गेल्यावर ते कसे परत मिळवायचे याची माहिती आपण बघू.
UPI च्या माध्यमातून चुकीच्या खात्यात पैसे गेल्यास काय करावे?
1- सगळ्यात अगोदर ट्रांजेक्शन डिटेल चेक करावे- तुमच्याकडे जर चुकून चुकीच्या नंबर वर किंवा खात्यावर पैसे गेले तर सगळ्यात अगोदर तुम्ही कोणत्या युपीआय च्या माध्यमातून पैसे पाठवले त्याच्या ट्रांजेक्शन हिस्टरीमध्ये जावे व सगळी डिटेल्स पहावी. नेमके कोणत्या खात्यात पैसे दिले आहेत हे तपासून त्या पेमेंटचा यूटीआर क्रमांक म्हणजेच व्यवहार आयडी लक्षात ठेवावा व सबंधित यूपीआय ॲपच्या कस्टमर केअर सेंटरशी पटकन संपर्क साधावा. तसेच प्रत्येक यूपीआय एप्लीकेशन मध्ये ग्राहकांसाठी सपोर्ट ऑप्शन असतो व त्या ठिकाणी जाऊन तुम्ही झालेल्या चुकीच्या व्यवहाराची तक्रार करू शकतात. ट्रांजेक्शन आयडी टाकून तक्रार दाखल करता येते. या प्रक्रियेत यूपीआय एप्लीकेशनची टीम रिसिवर बँकेशी संपर्क साधते व पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करते.

2- तुमच्या बँकेशी कॉन्टॅक्ट करावा- सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेच्या शाखेत जावे किंवा त्या बँकेच्या कस्टमर केअर नंबर वर कॉल करून झालेला चुकीचा व्यवहाराचा तपशील म्हणजे ट्रांजेक्शन आयडी आणि तारीख इत्यादी बद्दल माहिती द्यावी. अशाप्रकारे तुमचे खाते असलेली बँक समोरच्या व्यक्तीच्या रिसिव्हर बँकेला चुकीचे पेमेंट परत करण्यासाठी विनंती पाठवते.
3-NPCI कडे तक्रार दाखल करू शकता- आपल्याला माहित असेल की सर्व यूपीआय ॲपचे नियमन नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात एनपीसीआयच्या माध्यमातून केले जाते.जर तुम्हाला वरील दोन्ही पर्यायद्वारे तुम्हाला योग्य मदत मिळाली नाही तर तुम्ही एनपीसीआय वेबसाईटवर जाऊन त्या संबंधीची तक्रार दाखल करू शकता.जर मोठी रक्कम चुकीच्या खात्यावर केली असेल तर तुम्ही जवळच्या पोलीस सायबर क्राईम सेलकडे देखील तक्रार करू शकतात. याकरिता तुम्हाला तुमच्या चुकीच्या झालेल्या पेमेंटचा स्क्रीन शॉट, ट्रांजेक्शन आयडी आणि एप्लीकेशन डिटेल्स देणे गरजेचे असते. अशाप्रकारे पोलिस आणि आणि बँक पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करतात.