MSME Credit Card:- सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) क्रेडिट कार्ड जारी करणे हे एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी पाऊल ठरणार असून ज्यामुळे लहान व्यवसायांना सुलभपणे वित्तपुरवठा म्हणजेच आर्थिक मदत मिळवणे शक्य होईल. यामुळे व्यवसायांना त्यांच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी अधिक लवचिकता मिळेल आणि त्यांचे कार्य प्रभावीपणे चालू ठेवता येईल.
केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणा
केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये केलेल्या घोषणेनुसार सूक्ष्म उद्योगांना १० लाख पर्यंत क्रेडिट कार्ड मिळवता येईल.ज्यामुळे त्यांची वित्तीय गरजा पूर्ण होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल.
प्रत्येक क्रेडिट कार्डला ५ लाखांच्या मर्यादेची एक रक्कम असणार आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना तातडीने आर्थिक अडचणींवर मात करता येईल आणि त्यांची आर्थिक समस्याही कमी होईल.
क्रेडिट कार्डमुळे सूक्ष्म उद्योगांना फायदा
सूक्ष्म उद्योगांसाठी क्रेडिट कार्डची योजना खूप फायदेशीर ठरू शकते. या निर्णयामुळे लहान व्यवसायांना त्यांच्या कार्यकुशलतेसाठी आवश्यक असलेल्या भांडवलाची सहज उपलब्धता होईल.
ज्योती प्रकाश गाडिया रिसर्जेंट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, ही योजना व्यवसायांना त्यांचे खेळते भांडवल स्थिर आणि उपलब्ध करून देण्यास मदत करेल आणि त्यांनीही इतर आर्थिक आव्हानांचा सामना करणे सोपे होईल.
अधिक कर्ज उपलब्ध होईल
नवीन अर्थसंकल्पानुसार क्रेडिट गॅरंटी कव्हर ५ कोटींवरून १० कोटींपर्यंत वाढवले गेले आहे. यामुळे पुढील पाच वर्षांत १.५ लाख कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज व्यवसायांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे निर्णय एमएसएमई क्षेत्रासाठी एक मोठी चालना आहे. ज्यामुळे सूक्ष्म आणि लघु उद्योगांच्या आर्थिक अडचणी कमी होतील.
वेळेवर कर्ज उपलब्ध करणे आणि नोकरशाही अडथळे
तथापि काही आव्हाने अद्याप कायम आहेत. कर्ज वितरण प्रक्रियेतील नोकरशाहीचे अडथळे आणि वेळेवर कर्ज मिळण्यास होणारा विलंब हे एमएसएमई क्षेत्रासाठी कायम असलेल्या समस्या आहेत.
स्ट्रॅटाफिक्स कन्सल्टिंगचे सह-संस्थापक मुकुल गोयल म्हणाले की, योजना आशादायक असल्या तरी व्यवसायांसाठी वेळेत कर्ज मिळवणे महत्त्वाचे आहे. यासाठी अधिक सुलभ प्रक्रिया आणि कर्ज वितरणाचे कार्य अधिक प्रभावी होणे आवश्यक आहे.
एमएसएमईसाठी क्रेडिट कार्ड कसे मिळवायचे?
उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत सूक्ष्म उद्योगांसाठी ५ लाखांच्या मर्यादेसह क्रेडिट कार्ड मिळवता येईल. सूक्ष्म उद्योजकांसाठी ही एक मोठी संधी आहे.
कारण ते आता ५ लाख पर्यंत क्रेडिट कार्ड घेऊ शकतील.तसेच सरकार १० लाख क्रेडिट कार्ड जारी करण्याची योजना बनवत आहे. हे क्रेडिट कार्ड लघु व्यवसायांसाठी खेळते भांडवल मिळवण्याचा एक आदर्श मार्ग बनू शकतो.
नवीन क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक तयारी
जर तुम्ही एक सूक्ष्म व्यवसायिक असाल तर उद्यम पोर्टलवर नोंदणी करा आणि तुमच्या क्रेडिट कार्डच्या साठी अर्ज करा. या नव्या योजनेचा फायदा घ्या आणि तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक वाढीसाठी असलेल्या या योजनेचा फायदा घ्या.