Multibagger Penny Stock : ग्लोबल टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, सॉफ्टवेअर आणि बिझनेस सोल्यूशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या सिल्व्हरलाइन टेक्नॉलॉजीज (Silverline Technologies) या कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.
गेल्या २७ जानेवारीपासून या शेअरला सलग अपर सर्किट लागत असून अवघ्या एका महिन्यात सुमारे ७० टक्क्यांची उसळी नोंदवली गेली आहे. कंपनीने नुकताच लॉन्च केलेल्या ‘SilverAI’ या एआय-सक्षम वेब प्लॅटफॉर्ममुळे गुंतवणूकदारांचा उत्साह वाढल्याचे दिसून येत आहे.

याच महिन्याच्या २ तारखेला कंपनीने ‘SilverAI’ हा प्लॅटफॉर्म सादर केला. या प्लॅटफॉर्मला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून अवघ्या एका आठवड्यात सुमारे २५ हजार युजर्सनी नोंदणी केली आहे.
येत्या ४५ दिवसांत ही संख्या ५ लाखांपर्यंत पोहोचेल, असा कंपनीचा अंदाज आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने ‘प्रो’ मेंबरशिपची फी ९ डॉलर प्रति युजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुढील सहा महिन्यांसाठी अटी व शर्तींनुसार प्रो व्हर्जन मोफत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
जर ५ लाख युजर्स दरमहा ९ डॉलर शुल्क भरून या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले, तर कंपनीची वार्षिक महसूल क्षमता ४३० ते ४५० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. कं
पनीचे एमडी याकिन जोशी यांनी सांगितले की, युजर्सच्या वाढत्या प्रतिसादानुसार कंपनी किंमत धोरण निश्चित करत आहे. ५ लाख नोंदणीकृत युजर्सचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर सशुल्क सदस्यसंख्या वाढवण्याचा मानस आहे.
शेअर बाजारातील कामगिरी पाहता, बीएसईवर काल हा शेअर १३.३१ रुपयांवर बंद झाला होता. आज तो ५ टक्क्यांनी वाढून १३.९७ रुपयांवर उघडला, जो आजचा अपर सर्किट स्तर आहे. १२ जानेवारी रोजी हा शेअर ८.२२ रुपयांवर होता.
१९९२ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी एंटरप्राइज सॉफ्टवेअर, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि आयटी कन्सल्टिंगमध्ये तीन दशकांचा अनुभव राखते.
न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये सूचीबद्ध होणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली होती. २००२ मध्ये नॅसकॉमने तिला भारतातील सातवी सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी म्हणून गौरविले होते.













