Top Stock:- सध्या शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता दिसून येत आहे. एफआयआय (परदेशी गुंतवणूकदार) सतत शेअर्स विकत असल्याने आणि व्यापार युद्धाच्या भीतीमुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चितता आहे. विशेषतः मिडकॅप आणि स्मॉलकॅप स्टॉक्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
ज्यामुळे अनेक गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. अशा परिस्थितीत दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मजबूत मूलभूत तत्त्वांवर आधारित स्टॉक्स शोधणे महत्त्वाचे आहे.
![multibagger stock](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/vv.jpg)
याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी पुढील 12 महिन्यांसाठी पाच टॉप स्टॉक्स निवडले आहेत.जे गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. या स्टॉक्समध्ये 47% पर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बारा महिने कालावधीसाठी सुचवलेले स्टॉक्स
टाटा कंझुमर प्रॉडक्ट
टाटा ग्रुपच्या टाटा कंझुमर प्रॉडक्ट कंपनीला दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक मजबूत पर्याय म्हणून पाहिले जात आहे. FMCG क्षेत्रातील ही कंपनी चहा, कॉफी आणि इतर ग्राहक उत्पादने तयार करते. ११ फेब्रुवारी रोजी हा स्टॉक 1013.60 वर बंद झाला होता.
तर पुढील 12 महिन्यांसाठी याचा टार्गेट प्राइस 1130 निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ सध्याच्या किमतीतून सुमारे 11.48% वाढ होऊ शकते. कंपनीचा ब्रँड प्रभावी असल्याने आणि ग्राहकांचा ओढा सातत्याने वाढत असल्यामुळे हा स्टॉक चांगला परतावा देऊ शकतो.
आयसीआयसीआय बँक
ही भारतातील एक आघाडीची खासगी बँक असून गेल्या काही वर्षांपासून ती स्थिर आणि दमदार कामगिरी करत आहे. बँकेची वित्तीय स्थिती मजबूत आहे आणि क्रेडिट ग्रोथही चांगली दिसून येते. ११ फेब्रुवारी रोजी हा स्टॉक 1253.40 वर होता आणि पुढील12 महिन्यांसाठी त्याचा संभाव्य टार्गेट प्राइस 1550 ठरवण्यात आला आहे.
त्यामुळे या स्टॉकमध्ये सुमारे 23.66% वाढ होण्याची शक्यता आहे. बँकेची मजबूत ग्राहकवर्गाशी असलेली बांधिलकी, नवनवीन तंत्रज्ञानावर भर आणि वाढत्या डिजिटल बँकिंग सेवांमुळे भविष्यात हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरू शकतो.
मॅक्स हेल्थकेअर
आरोग्यसेवा क्षेत्रात स्थिर आणि सतत वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये मॅक्स हेल्थकेअर चा समावेश केला जातो. भारतातील हेल्थकेअर क्षेत्र वेगाने विस्तारत असून या क्षेत्रातील गुंतवणुकीला चांगले भविष्य आहे. 11 फेब्रुवारी रोजी मॅक्स हेल्थकेअरचा स्टॉक 1020.40 वर बंद झाला होता.
तर पुढील एका वर्षासाठी याचे टार्गेट प्राइस 1300 निश्चित करण्यात आले आहे. याचा अर्थ यात 27% वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्यसेवेकडे वाढती लोकसंख्या आणि आधुनिक वैद्यकीय सेवांसाठी वाढती मागणी लक्षात घेता ही कंपनी भविष्यात मोठ्या प्रमाणात फायदा देऊ शकते.
एसआरएफ लिमिटेड
ही केमिकल, स्पेशियलिटी केमिकल्स आणि इंडस्ट्रियल गॅसेसच्या उत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी कंपनी आहे. औद्योगिक क्षेत्रात सातत्याने होणाऱ्या विस्तारामुळे आणि नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन क्षमता वाढवल्यामुळे कंपनीने मजबूत आर्थिक स्थिती राखली आहे.
11 फेब्रुवारी रोजी हा स्टॉक 2809.35 वर बंद झाला होता.तर पुढील 12 महिन्यांसाठी त्याचा टार्गेट प्राइस 3540 निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे यात सुमारे 26% वाढ होऊ शकते. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी आणि कंपनीची मजबूत बाजारपेठ लक्षात घेता हा स्टॉक दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.
लेमन ट्री हॉटेल्स
हॉटेल आणि रिसॉर्ट व्यवसायामध्ये सतत वाढ होत असून लेमन ट्री हॉटेल्स ही भारतातील प्रमुख बजेट आणि मिड-रेंज हॉटेल ब्रँड आहे. पर्यटन उद्योगातील वाढत्या संधींमुळे आणि वाढत्या ग्राहक संख्येमुळे ही कंपनी मजबूत स्थितीत आहे. 11 फेब्रुवारी रोजी हा स्टॉक 129.15 वर बंद झाला होता
आणि पुढील 12 महिन्यांसाठी त्याचा संभाव्य टार्गेट प्राइस 190 निश्चित करण्यात आला आहे. याचा अर्थ यात 47% पेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. हॉटेल क्षेत्रातील सतत होणाऱ्या विस्तारामुळे आणि कंपनीच्या भक्कम व्यवसाय धोरणांमुळे हा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतो.