गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉक शोधत आहात का? ‘या’ मल्टीबॅगर स्टॉकवर करा फोकस; 5 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 1518% परतावा

सध्या शेअर मार्केटची स्थिती जर बघितली तर त्यामध्ये काहीशी चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव दिसून येत असून नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला शपथविधी व त्यांनी केलेल्या काही घोषणा यांचा देखील शेअर बाजारावर प्रभाव पडताना आपल्याला दिसून येत आहेत.

Multibagger Stock:- सध्या शेअर मार्केटची स्थिती जर बघितली तर त्यामध्ये काहीशी चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहेत. यामध्ये अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा प्रभाव दिसून येत असून नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेला शपथविधी व त्यांनी केलेल्या काही घोषणा यांचा देखील शेअर बाजारावर प्रभाव पडताना आपल्याला दिसून येत आहेत.

या सगळ्या परिस्थितीमध्ये मात्र गुंतवणूकदारांची चांगला स्टॉक शोधण्यामध्ये बरीच दमछाक होताना देखील दिसून येत आहे. कारण कुठलेही गुंतवणूकदार कायम चांगल्या स्टॉकच्या शोधात असतात. कारण आपण केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल ही प्रत्येकाची अपेक्षा असते.

अगदी याच पद्धतीने तुम्ही देखील गुंतवणुकीसाठी चांगला स्टॉकच्या शोधात असाल तर तुमचा शोध आज संपेल. कारण आपण एक महत्त्वाच्या शेअरविषयी माहिती यामध्ये बघणार आहोत.ज्याने खूप कमी वेळेमध्ये शेअर होल्डर्सना खूप मोठ्या प्रमाणावर परतावा दिला आहे व हा शेअर आहे V2 रिटेलचा होय.या शेअरवर तुम्ही फोकस करू शकतात.

ही कंपनी सध्या खूप वेगाने वाढणारी रिटेल कंपन्यांपैकी एक असून शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये या कंपनीच्या शेअर्सनी पाच टक्क्यांच्या वर अप्पर सर्किटला धडक दिली व BSE वर 1840 वर हा क्लोज झाला. जर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक बघितला तर तो 1950 आणि निचांक 318.75 रुपये आहे.

V2 रिटेल शेअरने कसा केला आहे परफॉर्मन्स?
या शेअरची जर गेल्या सहा महिन्यातील कामगिरी बघितली तर ती खूप मजबूत आणि चांगली असून या शेअरने गुंतवणूकदारांना 120 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला असून एका वर्षात या शेअरमध्ये तब्बल 440 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

जानेवारी 2020 मध्ये V2 रिटेलच्या एका शेअरची किंमत 113.75 रुपये होती व आज ती तब्बल 1840 रुपये इतकी झाली आहे.सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे पाच वर्षात गुंतवणूकदारांना या शेअरने तब्बल 1518 टक्क्यांचा नफा किंवा परतावा दिला आहे. म्हणजे पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचे पैसे 16 पट वाढले आहेत.

V2 रिटेलचे तिमाही निकाल आले अतिशय उत्कृष्ट
V2 रिटेल ने या आर्थिक वर्षाच्या तिमाही मध्ये खूप चांगली आर्थिक कामगिरी केली आहे व या कंपनीचा महसूल तब्बल वार्षिक आधारावर 58 टक्क्यांनी वाढून 590.9 कोटी रुपये झाला. इतकेच नाही तर या कंपनीचे मार्जिन गेल्यावर्षीच्या याच तिमाहीत असलेल्या 31.4 टक्क्यांवरून वाढून 32.1% पर्यंत किंचितसे सुधारले देखील आहे.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर ८३ टक्क्यांनी वाढला असून तो 111.5 कोटी झाला आहे.तसेच EBITDA मार्जिन जर बघितले तर ते 2024 च्या याच तिमाहीच्या 16.3% वरून 18.9% पर्यंत वाढले आहे.

अशा पद्धतीने सगळ्याच टप्प्यांवर या कंपनीची कामगिरी उत्तम असल्यामुळे येणाऱ्या कालावधीत हा शेअर गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतो अशी एक शक्यता यामध्ये दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe