1 लाखाच्या गुंतवणुकीत मिळालेत 64 लाख ! ‘या’ शेअर्सने बनवलं मालामाल, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का?

Published on -

Multibagger Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांना नेहमीच लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. गुंतवणूकदारांनी योग्य शेअरची निवड केली आणि थोडा संयम ठेवला तर त्यांना मार्केट नक्कीच चांगले रिटर्न देऊन जाते.

मात्र मार्केटमध्ये असेही काही शेअर्स असतात जे की आपल्या गुंतवणूकदारांना कमी दिवसांमध्ये चांगला परतावा देतात. दरम्यान आज आपण अशा एका शेअरची माहिती पाहणार आहोत ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार फक्त चार वर्षांमध्ये लखपती झाले आहेत.

येथे ज्या गुंतवणूकदारांनी चार वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीचे मूल्य आज 64 लाख एवढे झाले आहे. नक्कीच आता तुम्हाला या शेअर्स बाबत माहिती जाणून घ्यायची असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कोणता आहे हा स्टॉक.

या स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले लखपती

नेटवर्क पीपल सर्व्हिसेस टेक्नोलॉजीजने चार वर्षात गुंतवणूकदारांना 16270% रिटर्न दिलेत. या शेअर्समध्ये जानेवारी 2022 पासून तेजी आली. हा स्टॉक मागील वर्षाच्या ऑगस्ट 2024 पर्यंत तेजीत राहिला.

मात्र त्यानंतर शेअर्समध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळाली. गेल्या वर्षी या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. पण तरीही या शेअरची किंमत 3577 रुपयांच्या विक्रमी हायवर आहे.

या स्टॉकमध्ये पहिल्यांदा 2022 मध्ये तेजी आली. यावर्षी त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 201% रिटर्न दिलेत. पण यातील गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष अधिक लाभदायक ठरले कारण की यावर्षी गुंतवणूकदारांना यातून 1012% इतके रिटर्न दिलेत.

तर, 2024 मध्ये ऑगस्ट महिन्यापासून घसरण सुरू झाल्यानंतरही या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना संपूर्ण वर्षात 226% एवढे रिटर्न दिलेत. पण मागील वर्षी यात 47 टक्क्यांची घसरण झाली.

हा स्टॉक लिस्ट झाल्यानंतर एका वर्षातील ही सर्वात मोठी घसरण सुद्धा आहे. मात्र असे असले तरी 2022 मध्ये ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 64 लाख रुपये एवढे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News