Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजची बातमी फारच उपयुक्त ठरणार आहे. शेअर मार्केट मध्ये असे अनेक स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. काही शेअर्सने लॉन्ग टर्म मध्ये तर काही शेअर्सने शॉर्ट टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे.
शेअर बाजारातील तज्ञ नेहमीच गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला देतात. लॉंग टर्म मध्ये गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते आणि रिटर्न चांगले मिळतात त्यामुळे लॉंग टर्म मध्येच गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्याने एका लाखाचे 64 लाख रुपये बनवले आहेत.

अर्थात या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना काही वर्षांच्या काळातच मालामाल बनवले आहे. दरम्यान आता आपण हा स्टॉक नेमका कोणता आहे आणि या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कसा फायदा मिळालाय याबाबत आता आपण माहिती जाणून घेऊया.
कोणता आहे तो शेअर
महारत्न कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना लॉंग टर्म मध्ये चांगला फायदा मिळवून दिलाय. गेल्या 15 वर्षांत या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे 64 लाख बनवले आहेत. ऑक्टोबर 2010 मध्ये या कंपनीचा स्टॉक 62.97 रुपयावर ट्रेड करत होता.
तर आज या कंपनीच्या शेअरची किंमत 339.55 रुपये आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या 15 वर्षांच्या काळात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चारवेळा बोनस शेअर दिले आहेत. जुलैमध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 बोनस दिला होता.
त्यानंतर 2016 मध्ये पुन्हा 1:1 बोनस मिळाला. 2017 मध्ये कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात बोनस दिला. यावर्षी जून महिन्यात कंपनीने पुन्हा आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस दिले आहेत.
दरम्यान 2010 मध्ये जर शेअर होल्डर्सने एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर त्यांना 1588 शेअर्स मिळाले असते. पण गेल्या पंधरा वर्षांच्या काळात शेअर होल्डर्सला चार वेळा बोनस दिले असल्याने
शेअर्सची संख्या आता 19 हजार 56 झाली आहे. यामुळे आता या एक लाख रुपयांची किंमत 64 लाख रुपये झाली आहे. कंपनीच्या या बोनसच्या धोरणामुळे लहान गुंतवणूकदारांना सुद्धा लॉन्ग टर्म मध्ये चांगला लाभ मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजही या कंपनीचे स्टॉक तेजीत आहेत. लॉंग टर्म मध्ये गुंतवणुकीसाठी आजही या स्टॉकला पसंती दाखवली जात आहे.