Multibagger Stock : 26 रुपयांचा ‘हा’ शेअर पोहोचला 196 रुपयांवर, गुंतवणूकदार तीन वर्षात मालामाल !

Content Team
Published:
Multibagger Stock

Multibagger Stock : शेअर मार्केटमधून नफा कमावण्यासाठी अनेक गुंतवणूकदार अधिक परतावा देणा-या स्टॉक कडे वळत असतात. दरम्यान असाच एक स्टाॅक म्हणजे त्याने गेल्या तीन वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पॉवर स्टॉकबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत 26 रुपयांवरून 196 पर्यंत वाढली आहे.

आम्ही ज्या कंपनीच्या स्टॉकबद्दल बोलता आहेत त्याचे नाव जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर्स असे आहे. जीनस पॉवरचा शेअर आज 52 आठवड्यांच्या विक्रमी पातळीवर व्यवहार करत आहे. यावेळी कंपनीची एकूण ऑर्डर बुक 8200 कोटींवर पोहोचली आहे.

मंगळवारी जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर 5.48 टक्क्यांनी वाढून 191.55 रुपयांवर बंद झाला. त्याच वेळी, आज म्हणजेच बुधवारी कंपनीचा शेअर 2.32 टक्क्यांच्या वाढीसह 195.85 च्या पातळीवर आहे. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये पॉवर स्टॉकची किंमत 10.52 टक्क्यांनी वाढली आहे.

पॉवर सेक्टर स्टॉकने गेल्या तीन वर्षांत 642 टक्के परतावा दिला आहे. 7 ऑगस्ट 2020 रोजी 25.8 रुपयांवर बंद झालेल्या जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स मागील सत्रात बीएसईवर 195.75 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. गेल्या 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरमध्ये 122.18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.

कंपनीचे एकूण 4.31 लाख शेअर्स बदलले, ज्यामुळे BSE वर 8.22 कोटी रुपयांची उलाढाल झाली. BSE वर कंपनीचे मार्केट कॅप वाढून 4,935 कोटी रुपये झाले. 8 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉकने 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळी 72.55 रुपये गाठली. जीनस पॉवरच्या शेअर्समध्ये यावर्षी 126.28 टक्के आणि गेल्या वर्षभरात 161.68 टक्के वाढ झाली आहे. सध्या जीनस पॉवर 195 रुपयांवर व्यवहार करत असून दैनंदिन चार्टमध्ये तेजी दर्शवित आहे. म्हणजेच भविष्यात या स्टॉकची किंमत आणखी वाढू शकते.

कंपनीचा व्यवसाय ?

जीनस पॉवर मुख्यत: टर्नकी आधारावर उत्पादन/मीटरिंग आणि मीटरिंग सोल्यूशन्स आणि अभियांत्रिकी, उत्पादन आणि करार करण्यात गुंतलेली आहे. कंपनी मीटरिंग बिझनेस आणि स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट अ‍ॅक्टिव्हिटी या दोन विभागांतून काम करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe