Multibagger Stock : शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना नेहमीच लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. शेअर मार्केटमध्ये पाच – दहा वर्षांच्या काळात गुंतवणूक केली तर गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळत असतो. दरम्यान आज आपण अशाच एका स्टॉक ची माहिती पाहणार आहोत ज्याने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलय.
पाच वर्षात या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे एका लाखाचे 1.90 कोटी रुपये झाले आहेत. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेअर बाजार मोठ्या प्रमाणात अस्थिर पाहायला मिळतो. मार्केटमध्ये सतत अप्स अँड डाऊन सुरू आहेत. यामुळे गुंतवणूकदार सुद्धा अस्वस्थ झाले आहेत.

अनेकांनी तर शेअर मार्केट ऐवजी सोन्या चांदीत गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले आहे. पण अशा या चढउताराच्या काळात काही असेही स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला आहे. ज्या कंपन्यांचे फंडामेंटल चांगले मजबूत आहेत तेथून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स मिळत आहे.
Indo Thai Securities Ltd च्या शेअर्सने देखील गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा दिला आहे. मंगळवारी या स्टॉकची किमत 4.13 टक्क्यांनी वाढून 326.70 रुपयांपर्यंत पोहोचली. गत पाच वर्षांच्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 19 हजार टक्क्याहून अधिक रिटर्न मिळाले आहेत.
गेल्या एका महिन्याच्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 96% रिटर्न मिळाले आहे. अर्थात तेच दिवसांपूर्वी जा गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये एक लाखाची गुंतवणूक केली असती त्यांना 1.96 लाख रुपये मिळाले असते.
म्हणजे फक्त तीस दिवसांमध्ये या स्टॉकने 96000 चा नफा मिळवून दिला आहे. एका महिन्यापूर्वी या स्टॉकची किंमत 166 रुपये होती आज ती 326 रुपयांपेक्षा अधिक आहे. या स्टॉकने यावर्षी आत्तापर्यंत 136% रिटर्न दिले आहेत.
तसेच गेल्या बारा महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने गुंतवणूकदारांना 302% रिटर्न दिले आहेत. अर्थात 365 दिवसांपूर्वी ज्या गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असतील त्या शेअर्सचे मूल्य आज चार लाख रुपये झाले आहे.
एका लाखाचे झालेत 1.90 कोटी
मागील 60 महिन्यांच्या काळात या स्टॉकने गुंतवणूकदारांना 19 हजार टक्के रिटर्न दिले आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाच वर्षांपूर्वी ज्यांनी या स्टॉक मध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक आतापर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर त्या गुंतवणूकदारांना आज 1.90 कोटी रुपये मिळतील. म्हणजे पाच वर्षात या स्टॉकने गुंतवणूकदारांना करोडपती बनवलय.