Multibagger Stock : टाटाची कमाल.. 21 रुपयांच्या शेअरने गुंतवणूकदार झाले मालामाल! दिला बंपर परतावा

Multibagger Stock : शेअर बाजारात गुंतवणूक करून चांगली कमाई करायची असे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असेल. परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे जोरदार कमाई करायची असेल तर योग्य कंपनीचा स्टॉक निवडणेही खूप गरजेचे असते.

जर तुम्ही योग्य कंपनीचा स्टॉक निवडला तर तुम्हाला पाहिजे तसा परतावा मिळत नाही तसेच अनेकदा गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतो. जर तुम्ही टाटाच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. या शेअरची किंमत 21 रुपयांवरून 850 रुपयांच्या पलीकडे गेली आहे.

महत्त्वाचे म्हणजे या कंपनीचा जून तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक 22 टक्क्यांनी वाढून 338 कोटी रुपयांवर गेला आहे. या तिमाहीत कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात 12 टक्क्यांनी वाढ होऊन 3471 कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायातील महसूल सात टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीचे उत्पादन

हे लक्षात घ्या Tata Consumer Products Limited ही भारतातील अग्रगण्य खाद्य आणि पेय कंपन्यांपैकी एक असून कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये चहा, कॉफी, पाणी, RTD, मसाले, मीठ, कडधान्ये, स्नॅक्स आणि मिनी फूड्सचा समावेश आहे. ही कंपनी जगातील दुसरी सर्वात मोठी ब्रँडेड चहा कंपनी आहे. टाटा टी, टेटली, टाटा कॉफी ग्रँड, टाटा कॉपर, हिमालयन नॅचरल मिनरल वॉटर आणि टाटा ग्लुको प्रमुख पेय या ब्रँडमध्ये समाविष्ट आहेत. त्याच्या फूड पोर्टफोलिओमध्ये टाटा सॉल्ट, टाटा संपन तसेच टाटा सोलफुल सारख्या ब्रँडचा समावेश आहे.

किंमत

आयसीआयसीआय सिक्युरिटीजने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सवर 1,010 रुपयांच्या टार्गेट किमतीसह बाय रेटिंग कायम ठेवण्यात आली आहे. हे लक्षात घ्या की शुक्रवारी ग्राहक उत्पादनांचे समभाग 1.10 टक्क्यांनी वाढून 859.40 रुपयांवर बंद झाले.

नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीजला 925 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉकवर खरेदी रेटिंग दिले आहे. मॉर्गन स्टॅन्लेच्या मतानुसार, मीठ आणि अ‍ॅफिनिटी व्यवसायातील मजबूत वाढीचा ट्रेंड टाटा ग्राहकांसाठी सकारात्मक आहे. परंतु चहाच्या व्यवसायात त्याचा बाजारातील वाटा कमी झाला आहे.

महत्त्वाचे म्हणजे 2003 मध्ये, 18 जुलै रोजी टाटा कंझ्युमरचे शेअर्स 21.31 रुपयांवर व्यवहार करत होते. तर आता या शेअरने 850 रुपयांचा आकडा पार केला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 883.95 रुपये आहे तर त्याचा नीचांक 686.60 रुपये इतका आहे.

मागील पाच दिवसांपासून हे शेअर्स व्यवहार करताना दिसत असून मागील 6 महिन्यांत या शेअरमध्ये 16.82 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर वर्षभराच्या आधारावर शेअर 12.74 टक्क्यांनी वाढला आहे. तर टाटा कंझ्युमर समभाग मागील वर्षभरात 5.95 टक्क्यांनी वाढले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe