Multibagger Stock : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोस्टाच्या बचत योजना तसेच बँकांच्या एफडी योजनांच्या तुलनेत शेअर मार्केट मधील गुंतवणूक रिस्की असते.
शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक जोखीम पूर्ण असते, पण अनेकदा काही शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा देऊन जातात. शेअर मार्केट मधून अनेकदा लॉन्ग टर्म मध्ये केलेल्या गुंतवणुकीत फायदा मिळतो.

पण असेही काही शेअर्स आहेत जे की शॉर्ट मध्ये गुंतवणूकदारांना चांगला नफा देतात. BoAt चे सहसंस्थापक आणि शार्क टॅंक इंडियातील लोकप्रिय जज अमन गुप्ता यांना सुद्धा असाच एक अनुभव आला आहे.
त्यांनी केलेल्या एका बटाटे वेफर्स आणि भुजिया बनवणाऱ्या कंपनीच्या गुंतवणुकीतून त्यांना मोठा नफा मिळाला आहे. स्नॅक ब्रँड ‘लेट्स ट्राय’ने अमन गुप्ता यांना 33,233% रिटर्न दिले आहेत.
अमन गुप्तांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (ट्विटर) वर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी स्नॅक ब्रांड लेट्स ट्राय मध्ये किती गुंतवणूक केली होती आणि यातून किती रिटर्न मिळालेत याची माहिती सांगितली आहे.
त्यांनी पोस्टमध्ये म्हटले की, लेट्स ट्रायमधील गुंतवणूक त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठी ठरली आहे. अमन गुप्ताने या स्नॅक ब्रँडमध्ये फार मोठी गुंतवणूक केलेली नाही पण छोट्या गुंतवणुकीतूनही त्यांना चांगला नफा मिळाला आहे.
या ब्रँडमध्ये त्यांनी फक्त बारा लाखांची गुंतवणूक केली होती आणि त्यांना चार वर्षांच्या काळात यातून 33 हजार 233% रिटर्न मिळाले आहेत. म्हणजे चार वर्षात त्यांची रक्कम 333 पट वाढली आहे.
अमन गुप्ता यांना बारा लाखाच्या गुंतवणुकीतून तब्बल 40 कोटी रुपयांचे रिटर्न मिळाले आहेत आणि या गुंतवणुकीतून मिळालेल्या नफ्यामुळे ते कमालीचे गदगद झाले आहेत.
शार्क टॅंक च्या इतिहासातील ही त्यांची सर्वाधिक फायद्याची डील असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही कंपनी बटाटे वेफर्स, भुजिया आणि विविध हेल्दी स्नॅक आयटम्स बनवत आहे आणि दिवसेंदिवस या कंपनीचे मार्केट कॅपिटल वाढत चालले आहे.













