Multibagger Stock : 2025 हे वर्ष आता समाप्तीच्या मार्गावर आहे. लवकरच 2026 या नव्या वर्षाला सुरुवात होणार असून 2026 सुरू होण्याआधीच शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
खरे तर 2025 शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी चढउताराचे राहिले आहे या वर्षात अनेक गुंतवणूकदारांचे पैसे पाण्यात गेले आहेत तर काही गुंतवणूकदारांना 2025 मधून जबरदस्त नफा मिळाला आहे.

चढ उताराच्या काळात सुद्धा या वर्षात काही शेअर्स मधून गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळाला असून आज आपण अशाच पाच शेअर्स बाबत माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त रिटर्न दिले आहेत. खरे तर, 1000% पेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या शेअरची यादी फार मोठी आहे मात्र आज आपण टॉप 5 निवडक शेअर्सची माहिती पाहणार आहोत.
Swan Defence and Heavy Industries Ltd. : या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 2025 मध्ये आत्तापर्यंत 3234% रिटर्न दिले आहेत. म्हणजेच गुंतवणूकदारांना या शेअर्सने करोडपती बनवली आहे. काही हजार रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या शेअर्समधून लखपती झाले आहेत. आधी ही कंपनी रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंग म्हणून ओळखली जात होती. सध्या या कंपनीचे शेअर्स 1260 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. मात्र बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर या कंपनीच्या शेअरची किंमत या वर्षाच्या सुरुवातीला 37.78 होती.
Midwest Gold Ltd : 2025 मध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या शेअर्सच्या यादीत या कंपनीचा पण समावेश करण्यात आला आहे. कारण की या कंपनीने यावर्षी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 3529% एवढे रिटर्न दिले आहेत. खरे तर या कंपनीचा शेअर 112 रुपयांच्या रेंजमध्ये वर्षाच्या सुरुवातीला व्यवहार करत होता. मात्र शुक्रवारी या शेअरची किंमत 4,048.85 रुपयांवर क्लोज झाली. म्हणजेच या स्टॉकने या वर्षात हजारो रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना सुद्धा लखपती बनवल आहे.
RRP Defense Ltd. : 2025 हे वर्ष या कंपनीसाठी विशेष लाभाचे राहिले आहे. यावर्षी आत्तापर्यंत या कंपनीचे शेअर्स 4510% वाढले आहेत. वर्षाच्या सुरुवातीला या शेअरची किंमत 20.31 होती. पण सध्या स्थितीला या कंपनीचे शेअर्स 937 रुपयांच्या आसपास व्यवहार करताना दिसत आहेत. या कंपनीला पूर्वी युरो एशिया एक्सपोर्ट्स लिमिटेड म्हणून ओळखल जात होत.
Swadeshi Industries Leasing Company Ltd. : ही कंपनी सुद्धा 2025 मध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या शेअरच्या यादीत समाविष्ट आहे. कारण म्हणजे या कंपनीचे शेअर्स 2025 मध्ये आत्तापर्यंत 4914% रिटर्न देण्यात यशस्वी ठरले आहेत. या कंपनीचे शेअर्स खरेदी करणारे गुंतवणूकदार एका वर्षातच करोडपती बनले आहेत. या कंपनीच्या शेअरची किंमत यावर्षी सुरुवातीला 2.92 रुपयांच्या आसपास होती. मात्र आता या कंपनीच्या शेअरची किंमत 146.40 झाली आहे.
RRP Semiconductor Ltd : शेअर मार्केट मध्ये लिस्ट ही कंपनी फार जुनी आहे. मात्र कंपनीसाठी हे वर्ष फारच लाभदायक राहिले आहे. यावर्षी या कंपनीच्या शेअरची किंमत 182 रुपयांवरून थेट 11,207 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच यावर्षी आत्तापर्यंत या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 6061% इतके जबरदस्त रिटर्न दिले आहेत. हे स्टॉक बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधील सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या शेअर्समध्ये येतात.













