Multibagger Stock : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेअर मार्केट व त्यावर आधारित म्युच्युअल फंड मध्ये अनेक लोक गुंतवणूक करतात. खरे तर शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांना काही वेळा चांगला पैसा मिळतो पण काही वेळा त्यांची गुंतवणूक अंगलट येते.
शेअर मार्केट मध्ये काही कंपन्यांचे शेअर्स असे आहेत जे की आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने चांगला परतावा देतायेत. काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना शॉर्ट टर्म मध्ये चांगला परतावा देतात तर काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना लॉन्ग टर्म मध्ये चांगले रिटर्न देतांना दिसतात.

दरम्यान आज आपण अशा एका स्टॉक ची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने गेल्या पाच वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या स्टॉकने गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे बारा कोटी बनवले आहेत आणि म्हणूनच हे शेअर्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
कोणता आहे तो स्टॉक
Hitachi Energy India कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजाना ठरले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉकच्या किमती 12500 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 2020 मध्ये हिताची एनर्जी इंडिया शेअर्सची किंमत 15 रुपये होती. पण आज पाच वर्षानंतर या शेअरची किंमत 19877 रुपये आहे.
अशा तऱ्हेने जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2020 मध्ये हिताची एनर्जी इंडियाचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते, तसेच आत्तापर्यंत ही गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर गुंतवणूकदाराच्या या शेअरचे मूल्य आज 12.60 कोटी इतके झाले असते. अर्थात पाच वर्षातच एक लाख रुपये गुंतवणारा माणूस करोडोंचा धनी झाला असता.
या करोडपती बनवणाऱ्या स्टॉकने गेल्या एका वर्षाच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना 64% रिटर्न दिले आहेत. तसेच या वर्षात आत्तापर्यंत हा स्टॉक 25 टक्क्यांनी वाढला आहे. अर्थात गेल्या पाच महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 25% रिटर्न दिले आहेत.