Multibagger Stock : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. शेअर मार्केटमध्ये असे काही स्टॉक आहे ते जे की गुंतवणूकदारांना चांगले जबरदस्त रिटर्न देत आहेत. अवघ्या काही महिन्यांच्या काळातच काही स्टॉक गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवतात.
आज आपण सहा महिन्यात गुंतवणूकदारांचे पैसे डबल करणाऱ्या मल्टीबॅगर शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. हा डिफेन्स सेक्टर मधील शेअर्स गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. अपोलो मायक्रो सिस्टिम्स या स्टॉकने गत पाच वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना 2000% रिटर्न देण्याची किमया केली.

तसेच गेल्या सहा महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांच्या एका लाखाचे दोन लाख बनवलेत. काल सुद्धा हा स्टॉक शेअर मार्केटमध्ये तेजीत राहिला. आता आपण या स्टॉकची गेल्या काही वर्षांची कामगिरी समजून घेणार आहोत. तसेच ही कंपनी काय करते याबाबतही माहिती पाहुयात.
स्टॉकची शेअर बाजारातील कामगिरी
शेअर मार्केट मध्ये अपोलो मायक्रो सिस्टिम्स स्टॉकची किंमत 10 मार्च रोजी 116.90 होती. पण यात गेल्या सहा महिन्यांच्या काळात प्रचंड वाढ झाली आहे. या स्टॉकची किंमत मंगळवारी 290.80 रुपयांवर पोहोचली आहे.
अर्थात गेल्या सहा महिन्यांच्या काळात या स्टॉकने 140.25% रिटर्न दिले आहेत. गेल्या पाच वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2300% रिटर्न दिले आहेत.
पाच वर्षांपूर्वी जर एखाद्या गुंतवणूकदाराने या कंपनीचे एक लाख रुपयांचे शेअर्स खरेदी केले असते तर त्यांचे मूल्य आज रोजी 24 लाख 23 हजार रुपये असते. म्हणजे पाच वर्षात थेट 23 लाखांचा फायदा झाला असता.
पाच वर्षांपूर्वी या स्टॉक ची किंमत फक्त अकरा रुपये होती. पण हा पेनी स्टॉक काही दिवसातच मल्टीबॅगर बनलाय. एकेकाळी अकरा रुपये यांवर ट्रेड करणाऱ्या या स्टॉकची किंमत मंगळवारी 290 पेक्षा अधिक होती. 60 महिन्यात या स्टॉक ने 2323.78% परतावा दिला आहे.
कंपनीचे कामकाज
अपोलो मायक्रो सिस्टीम्सबाबत बोलायचं झालं तर ही डिफेन्स सेक्टरमधील कंपनी आहे. अपोलो मायक्रो सिस्टिम मिसाइल प्रोग्राम्स (आर्म्स सिस्टम इलेक्ट्रॉनिक्स), अंडरवॉटर मिसाइल प्रोग्राम्स, एव्हियोनिक सिस्टम, पाणबुडीमधील यंत्रणेत वापरल्या जाणार्या उत्पादनांची रचना, विकास आणि वितरणचे काम करते.
थोडक्यात ही कंपनी इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम्सच्या पुरवठ्याशी संबंधित व्यापार करत आहे. ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल पण गत काही वर्षांमध्ये वाढले आहे. आज या कंपनीचे मार्केट कॅप 9240 कोटी रुपये आहे.