Multibagger Stock : गुंतवणूकदारांना ‘या’ शेअरने दिला बंपर परतावा, 1 लाखांचे झाले 53 लाख रुपये; तुमच्याही पोर्टफोलियोमध्ये आहे का?

Multibagger Stock : अनेकजण आजही एफडी, आरडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. यामागचं सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांना ही गुंतवणूक खूप सुरक्षित वाटते आणि दुसरे म्हणजे यामध्ये गुंतवणूक केली तर त्यांना पैसा बुडण्याचा धोका नसतो. परंतु सोनं सोडले तर इतर माध्यमात केलेल्या गुंतवणुकीवर खूप कमी परतावा मिळतो.

महत्त्वाचे म्हणजे अनेकजण एफडी, आरडी किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक न करता शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमध्ये जरी जोखीम आणि निश्चित परतावा मिळत नसला तरी काही शेअर्स गुंतवणूकदारांना मालामाल करतात.

असाच एक शेअर आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपयांवरून 53 लाख रुपये झाले आहेत. हा स्मॉल-कॅप फर्म टेलरमेड रिन्यूएबल्सचा शेअर आहे. जर तुमच्याकडेही हा शेअर असता तर तुम्हालाही त्याचा फायदा झाला असता.

1 लाख रुपयांची गुंतवणूक पोहचली 53 लाख रुपयांपर्यंत

या कंपनीचे शेअर्स मागील वर्षी 12 ऑगस्ट 2022 रोजी 12.26 रुपयांवरून 14 ऑगस्ट 2023 रोजी 652.20 रुपयांपर्यंत वाढले होते. याचाच असा की अर्थ वर्षापूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक सध्या 53 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. जर तुमच्याकडे या कंपनीचे शेअर्स असते तर तुम्हीही मालामाल झाला असता.

या वर्षी YTD मध्ये शेअर्सने 1,694.22% परतावा दिल्याचे पाहायला मिळत आहे. जर या शेअर्सच्या किमतीचा विचार केला तर या दरम्यान त्याची किंमत 36 रुपयांवरून सध्याच्या किंमतीपर्यंत वाढलेली आहे. मागील पाच दिवसांत हा शेअर 21.53% आणि एका महिन्यात 63.05% इतका वाढला आहे.

या शेअर्सने दिला बंपर परतावा

तसेच, पल्सर इंटरनॅशनल (3,770 टक्क्यांनी वाढ), प्राइम इंडस्ट्रीज (2,371 टक्क्यांनी वाढ), रेमिडियम लाइफकेअर (3,227 टक्क्यांनी वाढ) आणि K&R रेल इंजिनिअरिंग (2,450 टक्क्यांनी वाढ) यांनी एका वर्षात जोरदार परतावा दिलेला आहे.

इतकेच नाही तर RMC स्विचगियर्स, झावेरी क्रेडिट्स अँड कॅपिटल, श्री पेस्ट्रोनिक्स, व्हर्जो ग्लोबल, गुजरात टूलरूम, मर्क्युरी ईव्ही-टेक, अल्फा ट्रान्सफॉर्मर्स, नॉर्दर्न स्पिरिट्स, किंटेक रिन्युएबल्स, सोम दत्त फायनान्स कॉर्पोरेशन यांनी देखील याच दरम्यान 500-1400 टक्क्यांच्या वाढ केलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe