Multibagger Stock:- शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला जोखीम पत्करणे अतिशय गरजेचे असते. यामध्ये पैसा कमावता येतो व त्याला कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही. परंतु यात गुंतवलेला पैसा कधी कधी चुकीच्या निर्णयामुळे पूर्णपणे मातीमोल देखील होऊ शकतो. म्हणून तुम्ही ज्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल त्यासंबंधी तुम्ही संपूर्ण माहिती घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याच प्रमाणे जागतिक पातळीवरची समीकरणे बाजारावर प्रभाव टाकत असतात व तुम्हाला त्यामुळे सगळ्याच गोष्टींचा सांगोपांग विचार करणे तितकेच गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादले व त्यांच्या या निर्णयानंतर देखील बाजारात मोठी चढउतार आपल्याला पाहायला मिळाली होती. बऱ्याच कंपन्यांचे स्टॉक्स या कालावधीत घसरल्याचे आपल्याला दिसून आले. परंतु काही कंपन्यांचे स्टॉक्स मात्र या परिस्थितीमध्ये देखील वधारले. चला तर मग या लेखात आपण अशाच मल्टीबॅगर स्टॉक विषयी थोडक्यात माहिती बघू. ज्याने गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणावर मालामाल केले आहे.
कोलॅब प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोलॅब प्लॅटफॉर्म लिमिटेड या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना पाच वर्षांमध्ये मोठा परतावा दिला असून गुंतवणूकदार मालामाल झालेले आहेत. सध्या देखील गुंतवणूकदारांचा मोठ्या प्रमाणावर फोकस या शेअरवर असल्याचे दिसून येत आहे. पाच वर्षांपूर्वी जर आपण बघितले तर एका शेअरची किंमत एक रुपयांच्या आसपास होती व गेल्या शुक्रवारी यामध्ये तब्बल 8957.80 टक्क्यांची वाढ झाली व हा शेअर 98.73 रुपयांवर पोहोचला. वाढदिवसाच्या गुंतवणूकदारांनी दीर्घकालीन गुंतवणूक यात केली असेल त्यांना मोठा परतावा या शेअरच्या माध्यमातून मिळाला आहे.

कोलॅब प्लॅटफॉर्म लिमिटेड कंपनी काय करते?
ही कंपनी भारतीय टेक आणि डिजिटल कंपनी असून ई स्पोर्ट तसेच गेमिंग व क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ही कंपनी 1989 मध्ये सुरू करण्यात आली व आधी जेएसजी लिजींग लिमिटेड नावाने ओळखली जात होती. ही कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेड आहे. खेळाडू तसेच विविध संघ व चाहत्यांकरिता क्रीडा परिसंस्था सुधारण्याचे कंपनीची उद्दिष्ट असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी कंपनी नवीन तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत आहे.