1 लाख टाकलेत 60000000 रुपये कमावलेत….; 5 वर्षातच बनवलं करोडपती, शेअर मार्केटमधील ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांसाठी ठरला भाग्यशाली

Published on -

Multibagger Stock : तुम्हीही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय का ? मग आजची बातमी तुमच्या कामाची राहणार आहे. खरंतर, गेल्या काही महिन्यांपासून मार्केटमध्ये मोठा दबाव आहे.

थोड्याफार प्रमाणात मार्केट कव्हर होण्याचा प्रयत्न करते पण तरीही परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे मार्केट दबावात आहे. तसेच अशा या स्थितीत सुद्धा देखील काही स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत.

दरम्यान आज आपण मार्केट चढउतार होत असताना सुद्धा गेल्या पाच वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवणारे एका शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. शेअर मार्केट गुंतवणूकदारांना एका शेअर्सने एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून सहा कोटी रुपयांचा रिटर्न दिलेला आहे.

कोणता आहे तो स्टॉक

शेअर मार्केटमधील काही स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या काही वर्षात निगेटिव्ह रिटर्न दिले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत.

पण, शेअर मार्केटमध्ये असेही काही स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत आणि आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉकची माहिती येथे पाहणार आहोत.

मल्टीबॅगर स्टॉक्सची चर्चा होत असतांना इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या स्टॉकची चर्चा होणे स्वाभाविक आहे. कारण या पेनी स्टॉकने गेल्या पाच वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलय.

इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्सने गेल्या 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना थेट 60 हजार टक्के रिटर्न दिले आहेत. अर्थात जर या शेअरमध्ये 5 वर्षांपूर्वी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज ती गुंतवणूक जवळपास 6 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, हे रिटर्न स्टॉक स्प्लिट आणि बोनस इश्यूमुळे मिळालेल्या अतिरिक्त फायद्यांचा समावेश न करता मोजण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांत या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने 59,500 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

म्हणजे 5 वर्षात 1 लाख गुंतवणाऱ्यांना कंपनीने जवळपास पाच कोटी रुपयांचे निव्वळ रिटर्न मिळवून दिले आहेत. 1 सप्टेंबर 2024 रोजी 10:1 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट केला होता.

याशिवाय, एप्रिल 2024 मध्ये 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्सही दिले होते, ज्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. शेअरच्या अलीकडील कामगिरीवर नजर टाकली तर काही चढ-उतार दिसतील.

शुक्रवारी बीएसईवर हा शेअर 5 टक्क्यांनी वाढून 29.80 रुपयांवर पोहोचला. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने सुमारे 19 टक्क्यांचा परतावा दिलाय. मात्र, मागील एक वर्षात हा स्टॉक 18 टक्क्यांनी घसरलेला दिसतो. तसेच मागील पाच दिवसांत 11 टक्के, तर एका महिन्यात 24 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News