‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना बनवतोय मालामाल ! पाच वर्षात एका लाखाचे झालेत 1.14 कोटी

Published on -

Multibagger Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी आज आम्ही एक खास माहिती घेऊन आलो आहोत. आज आपण मार्केटमधील अशा एका स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत ज्याने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिले आहेत.

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स असं या कंपनीचे नाव. कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. ही फार्मा क्षेत्रातील एक बडी कंपनी आहे. या कंपनीच्या स्टॉकने गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न दिले आहेत.

खरंतर या कंपनीचे स्टॉक नऊ वर्षांपूर्वी फक्त 12.50 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र आज या स्टॉकची किंमत कित्येक पटीने वाढली आहे. आज हा स्टॉक 1425 रुपये झाला आहे. या शेअर्सने फक्त 9 वर्षात सुमारे 11,300% परतावा दिला आहे.

या स्टॉकने गेल्या सहा महिन्यांत सुद्धा आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. दरम्यान आता आपण ही कंपनी नेमकी काय काम करते आणि गेल्या काही महिन्यांची शेअर मार्केट मधील या कंपनीची स्थिती कशी राहिली आहे या संदर्भातील आढावा जाणून घेणार आहोत.

कंपनीचे काम काय? 

फ्रेडुन फार्मास्युटिकल्स ही एक भारतीय फॉर्म्युलेशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. याची स्थापना 1987 मध्ये करण्यात आली होती. याचा व्यवसाय अनेक देशांमध्ये आहे. औषधांबरोबरच या कंपनीने अलीकडेच पाळीव प्राणी टेक प्लॅटफॉर्म “WAGR” सुद्धा खरेदी केली आहे. 

कंपनीने दिलेत कोटींचे रिटर्न ? 

5 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवले आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ही रक्कम आजपर्यंत होल्ड करून ठेवली असती तर आज त्याचे मूल्य 1.14 कोटी रुपये झाले असते. अशाप्रकारे या स्टॉकने गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe