50 हजाराचे झालेत 25 लाख ! 5 वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल बनवणारे टॉप 5 शेअर्स, पहा संपूर्ण यादी

Multibagger Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी 2025 हे वर्ष चढउताराचे राहिले आहे. या वर्षात काही गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला परतावा मिळाला आहे तर काही गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागले आहे.

दरम्यान आज आपण मागील पाच वर्षात गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न देणाऱ्या पाच शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत. आज आपण ज्या शेअर्स विषयी माहिती जाणून घेणार आहोत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे एका लाखाचे 50 लाख केले आहेत.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी आपल्या अहवालात 2020 ते 2025 या कालावधीमध्ये सर्वाधिक रिटर्न देणाऱ्या शेअरची माहिती दिली आहे. आता आपण मोतीलाल ओसवाल यांनी सांगितलेल्या अशाच पाच शेअर्स बाबत माहिती पाहुयात.

महत्वाची बाब म्हणजे या यादीत जे शेअर्स आहेत त्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना 124% वार्षिक चक्रवाढ रिटर्न देण्याची किमया साधली आहे.

हे आहेत गुंतवणूकदारांना मालामाल बनवणारे टॉप 5 शेअर्स

पर्सिस्टंट सिस्टम्स : या यादीत पाचव्या क्रमांकावर पर्सिस्टंट सिस्टम्स या शेअरचा नंबर आहे. ही एक नामांकित आयटी कंपनी आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन क्षेत्रात ही कंपनी सेवा देत असून

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये या कंपनीच्या एका शेअरची किंमत 624 रुपये एवढी होती मात्र आज 2025 मध्ये या शेअरची किंमत 6365 रुपये एवढी झाली आहे. अर्थात वार्षिक 83% दराने या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना रिटर्न दिले आहेत.

जीई वर्नोव्हा टी अँड डी : मागील पाच वर्षांच्या काळात या कंपनीने 85 टक्के दराने आपल्या गुंतवणूकदारांना रिटर्न दिले आहेत. 2020 मध्ये या शेअरची किंमत 1692 एवढी होती मात्र आजच्या घडीला या शेअरची किंमत 2891 रुपये एवढी आहे.

जिंदाल स्टेनलेस : पाच वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 72 रुपये एवढी होती मात्र 2025 मध्ये हा स्टॉक आठशे रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय. अर्थात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 90 टक्के दराने रिटर्न दिलेले आहेत.

रेल्वे विकास निगम : गेल्या पाच वर्षांच्या काळात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना वार्षिक 95 टक्के दराने रिटर्न दिले आहेत. पाच वर्षांपूर्वी याची किंमत 33 रुपये होती मात्र आता हा स्टॉक 319 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.

बीएसई : या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षांच्या काळात 124 टक्के दराने रिटर्न दिलेले आहेत. याची किंमत पाच वर्षांपूर्वी 68 रुपये होती मात्र आता 2025 मध्ये हा शेअर्स 2680 रुपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करतोय.