Multibagger Stocks : अलीकडच्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही शेअर्स कधी बुडतात तर कधी अचानक उसळी घेतात. इतकेच नाही तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना 100 पट परतावा देखील मिळू शकतो.
सध्या शेअर मार्केटमध्ये असे अनेक शेअर्स आहेत जे दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देत आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदार करोडपती होतात. असाच एक शेअर आहे जो 48 रुपयांवरून 4800 रुपयांपुढे पोहोचला आहे.
मिळाला 100 कोटींहून जास्त परतावा
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ शेअरबद्दल बोलायचे झाल्यास त्याने 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या कालावधीसाठी 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल त्यांची 1 लाखाचे आता 1 कोटींपेक्षा जास्त झाले असतील. मार्च 2003 पासून 29 ऑगस्ट 2023 पर्यंत या शेअरच्या किमतीत 4823 रुपयांची वाढ झाली आहे.
2003 ते 2023 पर्यंत वाढले पैसे
किमतीचा विचार केला तर 28 मार्च 2003 रोजी अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेसच्या शेअरची किंमत फक्त 48.28 रुपये इतकी होती. 29 ऑगस्ट 2023 रोजी शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटी तो 4872 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे. तब्बल 70,019 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असणाऱ्या या कंपनीवर दीर्घकाळ विश्वास ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा शेअर नशीब बदलणारा ठरला आहे.
या शेअरची 52 आठवड्यांची उच्च पातळी 5,362.00 रुपये इतकी आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 4,078.40 रुपये इतकी आहे. मंगळवारी व्यापारादरम्यान तो 4,938 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता, मात्र त्यात घसरण होऊन व्यवहाराच्या शेवटी तो 0.60 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेस स्टॉक
या हॉस्पिटल स्टॉकची कामगिरी पाहिली तर, लिस्ट झाल्यापासून त्याने आपल्या गुंतवणूकदारांना 26,251.35 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर दुसरीकडे, मागील पाच वर्षांत या शेअरद्वारे मिळालेल्या परताव्यावर नजर टाकायची झाली तर ती 311.34 टक्के इतकी आहे.
मागील वर्षभरात या शेअरच्या किमतीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सहा महिन्यांतही, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्रायझेसचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरला आहे. त्याने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10.40 टक्के परतावा देण्याचे काम केले आहे. परंतु मागील महिनाभरात या शेअरच्या किमतीत 6 टक्क्यांची घट नोंदवली आहे.
सेन्सेक्स-निफ्टी
मंगळवारी, भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हिरव्या चिन्हावर बंद झाला आहे. तर सेन्सेक्स 79.22 अंकांच्या वाढीसह 65,075.82 वर बंद झाला आणि निफ्टी 36.60 अंकांच्या वाढीसह 19,342.65 वर बंद झाला आहे.