Mumbai Property News : राजधानी मुंबईत शिक्षण उद्योग व्यवसाय नोकरी अशा वेगवेगळ्या कारणास्तव लाखो लोको वास्तव्याला आहेत. दररोज येथे हजारो स्वप्न उराशी बाळगून लोक रोजगाराच्या शोधात दाखल होत असतात. दरम्यान जर तुम्हीही नवीन नोकरीसाठी मुंबईत येणार असाल आणि तुम्हाला स्वस्तात भाड्याचे घर हवे असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील घरांच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. येथील गगनचुंबी इमारतींप्रमाणेच येतील प्रॉपर्टी चे दरदेखील उंचावले आहेत. यामुळे मुंबईत घर खरेदी करणे फारच कठीण बनत चालले आहे.

नव्या घराचे दर तर वाढतच आहे शिवाय मुंबईत घरांचे रेंट पण वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांना भाड्याने राहणे सुद्धा परवडत नसल्याची वास्तविकता आहे. छोट्या फ्लॅटसाठी सुद्धा मुंबईतील काही भागांमध्ये महिन्याला 50 हजार रुपये मोजावे लागतात.
अशा स्थितीत जर तुम्ही नव्याने मुंबईत दाखल झाला असाल किंवा तुम्हाला नवीन भाड्याचे घर शोधायचे असेल तर आजची बातमी खास करणार आहे कारण की आज आपण असे पाच लोकेशन जाणून घेणार आहोत जिथे सर्वसामान्यांना स्वस्तात भाड्याचे घर उपलब्ध होऊ शकते.
पनवेल – मुख्य मुंबई पासून पनवेल फारच लांब आहे. मात्र हा भाग पण वेगाने विकसित होत आहे आणि नवी मुंबई मधील इतर भागांपेक्षा या भागात घरांचे रेंट फार कमी आहे. येथे तुम्हाला टू बीएचके घर भाड्याने घ्यायचे असेल तर 25 हजार रुपये महिना आणि वन बीएचके घर भाड्याने घ्यायचे असेल तर साधारणतः 15000 रुपये महिना द्यावा लागतो.
मीरा रोड – तुमच्याकडे जर एक लाख रुपये डिपॉझिट साठी असतील आणि तुम्हाला मुंबईत टू बीएचके फ्लॅट भाड्याने हवा असेल तर मीरा रोड तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरणार आहे. इथे मुंबईच्या तुलनेत तुम्हाला कमी भाडे द्यावे लागेल. मिरा रोड परिसरात टू बीएचके घरासाठी महिन्याला तीस ते पस्तीस हजार रुपये भाडे द्यावे लागते.
हा भाग सर्वच वाहतूक पर्यायांनी कनेक्ट आहे. वेस्टर्न रेल्वे लाईन वर हा परिसर येतो यामुळे तुम्हाला थेट चर्चगेट पर्यंत रेल्वे उपलब्ध होणार आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळच आहे, तसेच येत्या काळात येथे तुम्हाला मेट्रोची पण सुविधा मिळणार आहे.
ऐरोली – हा परिसर आयटीचा आहे. मात्र मुंबईपेक्षा वेगळं ठिकाण आहे. नवी मुंबईच्या इतर भागांपेक्षा तुम्हाला येथे स्वस्तात भाड्याचे घर मिळू शकते. वन बीएचके घरांसाठी तुम्हाला येथे 15 ते 25 हजार रुपये आणि टू बीएचके घरासाठी साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार रुपये मोजावे लागणार आहेत.
घाटकोपर आणि कुर्ला – घाटकोपर आणि कुर्ला हे दोन्ही भाग शहराजवळ आहेत. घाटकोपर हे सेंट्रल रेल्वे आणि मेट्रो लाईन एक चे इंटरचेंज आहे तर कुर्ला हे बीकेसी जवळील महत्त्वाचे जंक्शन. अशा स्थितीत तुम्हाला येथे वन बीएचके घर भाड्याने हवे असेल तर साधारणता महिन्याला पंधरा ते पंचवीस हजार रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.
कांदिवली आणि बोरिवली – कांदिवली आणि बोरिवली या भागांमध्ये सुद्धा शहरातील इतर भागांपेक्षा तुम्हाला स्वस्तात भाड्याचे घर मिळू शकते. या भागात जर तुम्ही भाड्याचे घर घेतले तर तुम्हाला टू बीएचके साठी साधारणता चाळीस हजार रुपयांपर्यंत भाडे द्यावे लागेल.
तसेच वन बीएचके साठी येथे 15 ते 25 हजार रुपये भाडे आहे. काही अपार्टमेंट मध्ये तुम्हाला तीस हजार रुपयांपर्यंत पण भाडे द्यावे लागू शकते. मात्र या भागाला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे.













