11 वर्षात टिप्पट परतावा ! ‘हा’ Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी ठरला कुबेरचा खजाना, 10 हजाराच्या गुंतवणुकीत मिळाले 25 लाख

Published on -

Mutual Fund News : अनेकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायची असते. तुम्हाला पण म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

खरेतर, ज्या लोकांना शेअर मार्केटचे फारसे ज्ञान नाही त्यांच्यासाठी म्युच्युअल फंडचा पर्याय बेस्ट ठरतो. गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडचा पर्याय नेहमीच फायदेशीर ठरला आहे.

विशेषता जे गुंतवणूकदार लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करतात त्यांना म्युच्युअल फंड मधून चांगले रिटर्न मिळाले आहेत. मार्केटमध्ये असे अनेक फंड्स आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांच्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट तिप्पट रिटन दिले आहेत.

दरम्यान, आज आपण गेल्या दहा-अकरा वर्षांच्या काळात गुंतवणूकदारांना तिप्पट रिटर्न देणाऱ्या एका फंडाची माहिती जाणून घेणार आहोत. यामुळे हा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी कुबेरचा खजाना सिद्ध झालाय.

कोणता आहे तो फंड?

Kotak Equity Savings Fund असे या Mutual फंडचे नाव. नोव्हेंबर 2025 मध्ये या म्युच्युअल फंड ला एकूण 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या अकरा वर्षांच्या काळात यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक तिप्पट झाली आहे.

सद्यस्थितीला या फंडाची AUM म्हणजे व्यवस्थापनाखालील मालमत्ता 8400 कोटी रुपये एवढी आहे. हा फंड 2014 मध्ये सुरू झाला होता.

दरम्यान हा म्युच्युअल फंड जेव्हा सुरू झाला त्यावेळी ज्यांनी दहा हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली असेल त्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक आता 29 हजार 659 रुपये झाली असेल.

यामध्ये Lumpsum गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना गेल्या 11 वर्षाच्या काळात वार्षिक 10.3 टक्के दराने रिटर्न मिळाले आहेत. तसेच यामध्ये एस आय पी करणाऱ्या गुंतवणूकदारांना वार्षिक 11.05 टक्के दराने रिटर्न मिळाले आहेत.

अर्थात जेव्हा म्युच्युअल फंड सुरू झाला तेव्हा दहा हजार रुपयांची एसआयपी ज्यांनी सुरू केली असेल आणि आत्तापर्यंत ही एसआयपी सुरू ठेवली असेल त्यांना 13.30 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 25.10 लाख रुपये मिळाले असतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe