Mutual Fund: टाटाच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेने बनवले करोडपती! 10 हजारांच्या एसआयपीने दिले 5.17 कोटी रिटर्न

Updated on -

Mutual Fund:- प्रत्यक्षरीत्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याऐवजी जर म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक केली तर यामध्ये जोखीम कमी असते व दीर्घकाळामध्ये परतावा देखील चांगला मिळतो. सध्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक म्युच्युअल फंड योजनांनी दीर्घ कालावधीमध्ये गुंतवणूकदारांना खूप चांगला असा परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड योजना फायद्याच्या ठरतात. त्यात जर आपण टाटा म्युच्युअल फंडातील अनेक फंड जर बघितले तर गुंतवणूकदार यामुळे मालामाल झाल्याचे आपल्याला दिसून येते व त्यापैकीच एक योजना जर बघितली तर ती म्हणजे टाटा लार्ज कॅप फंड ही योजना होय. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 7 मे 1998 रोजी लाँच करण्यात आलेल्या या योजनेला 27 वर्षे पूर्ण झालेले आहेत व तेव्हापासून गुंतवणूकदारांना खूप चांगले रिटर्न या माध्यमातून मिळत आहेत.

टाटा लार्ज कॅप म्युच्युअल फंडाचा परफॉर्मन्स कसा?

गेल्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये टाटा लार्ज कॅपिटल फंडाने एसआयपी करणाऱ्या गुंतवणूकदारांना 16.90% चा परतावा दिला आहे. उदाहरणाने जर हे समजून घ्यायचे असेल तर समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एक जून 1998 पासून या फंडात दहा हजार रुपयांची महिन्याला एसआयपी केली असेल तर त्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य आता 5.17 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. 27 वर्षात वार्षिक परतावा 16.90% दिला आहे. तुम्ही जर महिन्याला 10 हजाराची एसआयपी करायला सुरुवात केली तर 27 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमची एकूण गुंतवणूक 32 लाख 40 हजार रुपये इतकी जमा होते व व 27 वर्षानंतर या एकूण गुंतवणुकीचे मूल्य 5,17,31,021 रुपये इतके होते.

टाटा लार्ज कॅप फंडाची वैशिष्ट्ये

टाटा लार्ज कॅप फंडामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायचे असेल तर तुम्ही कमीत कमी 5 हजार रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करू शकतात व या फंडामध्ये एसआयपी करायची असेल तर किमान शंभर रुपयांपासून तुम्हाला सुरुवात करता येते. या फंडामध्ये लॉक इन कालावधी नाही. या फंडाचा बेंच मार्क निफ्टी 100 टीआरआय इंडेक्स आहे. तसेच 31 जुलै 2025 पर्यंत या फंडाचे खर्च गुणोत्तर 2.01% इतके आहे. इतकेच नाहीतर व्हॅल्यू रिसर्चने टाटा लार्ज कॅप म्युच्युअल फंडला चार स्टार रेटिंग देखील दिलेली आहे. आज पर्यंत या फंडाने पाच वर्षात 22.74% परतावा दिला आहे. तसेच तीन वर्षाच्या कालावधीत 16.54% आणि एक वर्षात 6.18% रिटर्न गुंतवणूकदारांना मिळाले आहेत. तसेच एकरकमी गुंतवणूकदारांना 18.89 टक्क्यांचा उत्तम परतावा या फंडाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंत मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe