Mutual Fund:- शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची असेल तर यामध्ये तुम्हाला जोखीम पत्करणे खूप गरजेचे असते. कारण तुम्हाला मिळणारा परतावा हा बाजारातील चढउतारावर अवलंबून असतो. परंतु त्याऐवजी जर म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली तर यात बाजाराच्या तुलनेत जोखीम कमी असते व त्यातल्या त्यात लार्ज कॅप फंड्स मध्ये जर गुंतवणूक केली तर यामध्ये कमी जोखीम असते व कमी परतावा देखील अपेक्षित असतो. परंतु यामध्ये काही लार्ज कॅप फंड अतिशय महत्त्वाचे असून त्यांचा परफॉर्मन्स जर बघितला तर त्यांनी पाच वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 24 ते 32 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिलेले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य पाच वर्षात तीन ते चार लाख रुपयांपर्यंत झाले आहे.
फायद्याचे लार्ज कॅप फंड्स कोणते?
1- यूटीआय बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट 50 ईटीएफ- हा एक लार्ज कॅप फंड्स असून गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा म्युच्युअल फंड ठरलेला आहे. या फंड्सने गुंतवणूकदारांना पाच वर्षात वार्षिक 24.39% परतावा दिला आहे. एक लाखाच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.97 लाख रुपये झालेले आहे.

2- एसबीआय बीएसई सेन्सेक्स नेक्स्ट 50 ईटीएफ- हा देखील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचा फंड ठरलेला आहे. या म्युच्युअल फंड्सने गुंतवणूकदारांना पाच वर्षांमध्ये वार्षिक 24.41% परतावा दिला आहे. म्हणजेच एक लाख रुपये पाच वर्षांकरिता गुंतवले असतील तर त्याचे मूल्ये 2.98 लाख रुपये झाले आहे.
3- आयसीआयसीआय प्रुडेन्शियल भारत 22 एसओएफ- डायरेक्ट प्लॅन- या म्युच्युअल फंड्सने देखील पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. गुंतवणूकदारांना पाच वर्षाच्या गुंतवणुकीवर वार्षिक 32.21 टक्के परतावा मिळाला आहे. म्हणजेच पाच वर्षांसाठी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्या एक लाखाचे 4.04 लाख रुपये झाले आहेत.