Mutual Fund : तुम्हालाही म्युच्युअल फंडात जास्त पैसे कमवायचे असतील तर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, होईल पैशांचा वर्षाव

Ahmednagarlive24 office
Published:

Mutual Fund : अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जबरदस्त परतावा देणाऱ्या योजनेत पैसे गुंतवत असतात. त्यात त्यांना फायदाही होतो. परंतु आजही अनेकजण जोखीम असणाऱ्या योजनेत पैसे गुंतवतात. यामध्ये म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

जर तुम्हाला बाजाराचा अभ्यास असेल आणि तुमची जोखीम घेण्याची तयारी असेल तर तुम्हीदेखील यात पैसे गुंतवू शकता. जर तुम्हाला म्युच्युअल फंडात जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.

यावर अनेक तज्ज्ञांचाही विश्वास असला तरी कोणत्याही म्युच्युअल फंडाच्या मागील कामगिरीवर गुंतवणूक करण्यासाठी पूर्णपणे विसंबून राहू नये. कारण कोणतेही फंड हाऊस त्याच्या मागील कामगिरीमध्ये चांगली किंवा कधी कधी वाईट कामगिरी करू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्हाला 3 घटकांकडे जास्त लक्ष द्यावे. कारण हे घटक तुमचे पैसे बुडण्यापासून वाचवू शकतात.

करा योग्य ठिकाणी गुंतवणूक

जर गुंतवणूकदाराला दीर्घकालीन यश मिळवायचे असेल तर गुंतवणूकदाराने योग्य प्रक्रियेचा अवलंब करावा. समजा तुम्ही योग्य मार्गाने गुंतवणूक केली तर तुमचे पैसे गमावण्याची शक्यता कमी आहे. परंतु खेदाची गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा उत्तम गुंतवणूकदारही चुका करत असतात.निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडाच्या नुकत्याच झालेल्या अहवालात असे सांगण्यात येत आहे की गुंतवणूक करत असताना गुंतवणूकदाराने गुंतवणूक प्रक्रियेकडे लक्ष दिले तर तो बाजारातील चढ-उतार पार करून त्याच्या सर्व गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल.

जोखीम व्यवस्थापन गरजेचे

हा लक्षात घ्या की उच्च जोखमीच्या गुंतवणुकीमुळे जास्त परतावा मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर त्याच वेळी, कमी जोखमीच्या गुंतवणुकीत फक्त कमी परतावा तुम्हाला मिळतो. त्यामुळे तज्ञ जोखीम व्यवस्थापनाला गुंतवणुकीसाठी एक चांगला पॅरामीटर मानतात. तसेच बाजारात अस्थिरता, व्याजदर आणि महागाई यांसारखे अनेक धोके असण्याची शक्यता नाकारता येत नाही. निप्पॉन फंड हे सर्व जोखीम सुरक्षा पातळी आणि पोर्टफोलिओ स्तरावर अतिशय काळजीपूर्वक हाताळत असल्याने त्यात कोणतीही गुंतवणूक बुडण्याचा धोका कमी प्रमाणात असतो.

करा बाजारावर लक्ष केंद्रित

सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदाराने जास्त परतावा असणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा जास्त स्थिर आणि नियमित परताव्याच्या गुंतवणुकीवर भर देणे गरजेचे आहे. या मागची दोन मुख्य कारणे आहेत.सर्वात अगोदर, दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी स्थिर आणि प्रक्रिया-चालित पद्धतीने गुंतवणूक करणे चांगले मानतात. निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड या तत्त्वावर कार्य करतो की स्टॉक कितीही चांगली कामगिरी करत असला तरी गुंतवणूकदाराला कसलाच फरक पडत नाही. तसेच त्याच्या जास्त वजनावर जास्त लक्ष द्यावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe