National Pension System : दरमहा 55 ते 60 हजार रुपये पेन्शन हवी असेल तर ‘इथे’ करा गुंतवणूक !

Published on -

National Pension System : म्हातारपण आरामात घालवायचे असेल तर, त्यासाठी नोकरीच्या काळापासूनच गुंतवणूक केली पाहिजे. जर असे केले नाही तर पुढील आयुष्य कोणावर तरी अवलंबून काढावे लागते, तसेच अनेक समस्यांचा सामना देखील  करावा लागतो.

असे बरेच लोक आहेत जे वेळेत निवृत्तीचे नियोजन करणे विसरतात. तर काही लोकांचे उत्पन्न कमी आहे म्हणून ते निवृत्तीचे नियोजन करू शकत नाही. पण ही एक मोठी चूक ठरू शकते, म्हातारपण आनंदाने घालवायचे असेल तर नोकरीच्या काळापासूनच निवृत्तीचे नियोजन केले पाहिजे, आज आम्ही तुम्हाला अशा एक गुंतवणुकीबद्दल सांगणार आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही तुमचे निवृत्ती नंतरचे आयुष्य अगदी मनासारखे जगू शकाल.

तुम्ही सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या NPS अंतर्गत देखील गुंतवणूक करू शकता, येथे तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून जास्त नफा मिळवू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टीम (National Pension System) ही दीर्घकालीन आणि ऐच्छिक गुंतवणूक योजना आहे जी निवृत्तीनंतर ग्राहकांना मदत करते. या योजनेत कोणती व्यक्ती गुंतवणूक करू शकते? तसेच ही योजना कशी काम करते चला जाणून घेऊया..

NPS मध्ये कोण गुंतवणूक करू शकते?

NPS अंतर्गत गुंतवणूक 18 वर्षे ते 70 वर्षे दरम्यान सुरू करता येते. अनिवासी भारतीय देखील यासाठी पात्र आहेत. NPS मध्ये किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे आवश्यक आहे. खाते उघडल्यानंतर, वयाच्या ६० वर्षापर्यंत परिपक्वतेवर योगदान द्यावे लागेल.

NPS मध्ये जमा केलेली रक्कम गुंतवण्याची जबाबदारी PFRDA द्वारे नोंदणीकृत पेन्शन फंड व्यवस्थापकाला दिली जाते. हे इक्विटी, सिक्युरिटीज आणि गैर-सरकारी रोख्यांमध्ये तसेच निश्चित उत्पन्नामध्ये गुंतवणूक करते.

जर तुम्ही यात 40 वर्षांनंतर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर दर महिन्याला NPS गुंतवणूक 15 हजार रुपये असेल. यानंतर तुमची एकूण गुंतवणूक 36 लाख रुपये होईल. गुंतवणुकीवर अपेक्षित परतावा 8 टक्के प्रतिवर्ष आहे. यामध्ये एकूण 88.9 लाख रुपये म्हणजेच एकूण नफा 52.94 लाख रुपये आहे. त्यानंतर तुम्हाला 23718 रुपये मासिक पेन्शन देखील मिळू शकते.

SWP नियोजन काय आहे?

यामध्ये, सेवानिवृत्तीवर जमा केलेल्या 53.36 लाख रुपयांपैकी, तुम्ही तुमच्या बँक खात्यात आणीबाणीसाठी 13 लाख रुपये ठेवू शकता आणि उर्वरित 40 लाख रुपयांसह एसडब्ल्यूपीची योजना करू शकता. यामध्ये एकूण 40 लाख रुपये जमा आहेत. ज्यामध्ये अंदाजे 10 टक्के परतावा मिळतो.

मासिक विड्रॉल 35 हजार रुपये आहे. हा कालावधी 25 लाख रुपयांपर्यंत आहे. आर्थिक मूल्याबद्दल बोलायचे तर ते 1 लाख 72 हजार 452 रुपये मिळेल. याचा अर्थ 25 वर्षांसाठी मासिक 35 हजार रुपये काढल्यानंतर 1.72 लाख रुपये म्युच्युअल फंडात सुरक्षित राहतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe