इमर्जन्सी पैसे लागत आहेत? तर डोन्ट वरी! एसबीआय देते 50 हजार ते 20 लाख रुपये पर्सनल लोन; वाचा माहिती

Ahmednagarlive24 office
Published:

SBI Personal Loan:- बऱ्याचदा जीवनामध्ये अचानकपणे काही कारणास्तव पैशांची गरज भासते. यामध्ये वैद्यकीय आणीबाणी असो किंवा मुलांचे शिक्षणासाठी लागणारा पैसा किंवा घराचे नूतनीकरण इत्यादीसाठी पैशांची आवश्यकता भासते व या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक इतका पैसा आपल्याजवळ असेलच असे होत नाही.

त्यामुळे बरेचजण कर्जाचा पर्याय निवडतात व यामध्ये पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज घेण्याला बरेचजण प्राधान्य देतात. जर आपण बँकांचा विचार केला तर देशातील बऱ्याच बँका या पर्सनल लोन देतात व प्रत्येक बँकांच्या अटी व शर्ती तसेच व्याजदर देखील वेगवेगळे असतात.

परंतु या बँकांच्यामध्ये जर स्टेट बँक ऑफ इंडिया बघितली तर ही देशातील सर्वात मोठी व प्रतिष्ठित अशी बँक असून या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक प्रकारच्या वित्तीय सेवा दिल्या जातात व या देण्यात येणाऱ्या वित्तीय सेवांमध्ये एसबीआय पर्सनल लोन म्हणजेच वैयक्तिक कर्ज देखील खूप महत्त्वाचे आहे.

ज्यांना पैशांच्या संबंधित वैयक्तिक खर्च भागवायचा असेल त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. तुमची कुठलीही पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी एसबीआय पर्सनल लोन उत्तम पर्याय आहे.

कसे आहे एसबीआय पर्सनल लोनचे स्वरूप?

एसबीआय पर्सनल लोन हे एक असुरक्षित प्रकारातले म्हणजेच या कर्जाकरिता तुम्हाला कुठलीही मालमत्ता तारण देण्याची आवश्यकता भासत नाही. एसबीआय पर्सनल लोनच्या माध्यमातून तुम्हाला 50000 पासून 20 लाख रुपये पर्यंतची रक्कम उपलब्ध होते व ही उपलब्ध झालेली रक्कम तुम्ही तुमच्या विविध वैयक्तिक गरजांसाठी वापरू शकता.

एसबीआयच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पर्सनल लोनचे व्याजदर जर बघितले तर ते आपल्याला स्पर्धात्मक स्वरूपाचे दिसून येतात व साधारणपणे 10.49 टक्क्यांपासून सुरू होतात.

तसेच घेतलेले हे कर्ज परतफेडीचा कालावधी जास्तीत जास्त सहा वर्षापर्यंत असू शकतो.त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार सुलभ मासिक हप्त्यांमध्ये या कर्जाची परतफेड करू शकतात.

एसबीआय पर्सनल लोन मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता

1- एसबीआय पर्सनल लोनसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय 21 ते 58 वर्षांच्या दरम्यान असावे.

2- अर्जदाराकडे 15000 च्या किमान मासिक उत्पन्नासह कायमस्वरूपी नोकरी किंवा संघटित व्यवसाय असणे आवश्यक आहे.

3- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बचत खाते असणे गरजेचे व अनिवार्य आहे.

4- अर्जदाराचा क्रेडिट स्कोर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असावा. जेणेकरून कर्ज मंजूर करणे सोपे जाते.

5- अर्जदाराला किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

एसबीआय पर्सनल लोनचे महत्वाचे प्रकार

1- एसबीआय फ्लेक्सी कर्ज- या प्रकाराच्या कर्जात तुम्हाला एक निश्चित रक्कम कर्ज म्हणून मिळते व ती तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकतात.

2- एसबीआय पेन्शनर कर्ज- हे कर्ज विशेषता सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात निवृत्त झालेल्या व्यक्तींसाठी दिले जाते.

3- एसबीआय क्विक पर्सनल लोन- हे कर्ज जलद आणि सोप्या प्रक्रियेद्वारे मिळणे शक्य आहे.

4- एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट कर्ज- या प्रकारचे कर्ज ज्यांना तात्काळ क्रेडिटची गरज आहे त्यांच्यासाठी प्रामुख्याने आहे.

5- एसबीआय सिक्युरिटीज वर मिळणारे कर्ज- या अंतर्गत मिळणारे कर्ज तुम्हाला तुमच्या सिक्युरिटीज वर घेता येते.

एसबीआय कडून पर्सनल लोन घेतल्यामुळे काय फायदे मिळतात?

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तुम्हाला पन्नास हजार ते वीस लाखापर्यंत कर्ज मिळणे शक्य आहे व महत्वाचे म्हणजे एसबीआय पर्सनल लोनचे व्याजदर 10.49 टक्क्यांपासून सुरू होतात व ज्यामुळे हा एक परवडणारा पर्याय आहे.

तसेच एसबीआय पर्सनल लोन परतफेडीचा कालावधी हा लवचिक असून तुम्ही मासिक हप्त्यांचे ओझे कमी करून सहा वर्षापर्यंतच्या कालावधीत त्या कर्जाची परतफेड करू शकतात व कर्ज मिळवण्याची प्रक्रिया अतिशय जलद आहे. तुम्ही एसबीआय योनो एप्लीकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकतात.

एसबीआय पर्सनल लोनसाठी कसा कराल अर्ज?

1- एसबीआय पर्सनल लोनसाठी अर्ज करायचा असेल तर त्याकरिता एसबीआय किंवा एसबीआय योनो ॲपच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

2- त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या मेन पेजवरील कर्ज विभागात वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडावा.

3- हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारच्या कर्जाची माहिती मिळेल व यामधून योग्य कर्ज निवडावे आणि आता अर्ज करा यावर क्लिक करावे.

4- विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.

5- त्यानंतर तुमचा अर्ज सबमिट केला जातो आणि बँकेद्वारे त्या अर्जाची छाननी केली जाते.

6- बँकेद्वारे छाननी केल्यानंतर एकदा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात कर्जाची रक्कम मिळते.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe