New Rules : लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे दरम्यान नव वर्ष सुरू होण्याआधीच भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर नव्या वर्षात काही नवीन नियम लागू होणार आहेत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की देशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे दोन महत्त्वाचे ओळखीचे पुरावे आहेत. यातील पॅन कार्ड हे प्रत्येक वित्तीय कामासाठी आवश्यक असा पुरावा आहे.

पॅन कार्ड विना भारतात कोणतेच वित्तीय काम होऊ शकत नाही हे कार्ड शासकीय आणि निमशासकीय कामांमध्ये अतिशय उपयोगी ठरते. या विना कोणतच आर्थिक काम केलं जाऊ शकत.
मात्र काही लोकांचे हेच अति महत्त्वाचे पॅन कार्ड एक जानेवारी 2026 पासून इनऑपरेटिव्ह म्हणजेच अकार्यक्षम होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे आणि यासाठी शासनाने आता शेवटची मुदत दिली आहे.
आधार आणि पॅन लिंक साठी शासनाकडून वेळोवेळी मुदतवाढ मिळत राहिली आहे आणि अखेर आता शासनाने 31 डिसेंबर ही शेवटची मुदत राहणार असे स्पष्ट केले आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार कार्ड सोबत पॅन लिंक करणे आवश्यक आहे. शासनाने मार्च 2025 मध्ये एक अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेनुसार एक ऑक्टोबर 2024 पूर्वी ज्यांनी आधार एनरोलमेंट आयडी वापरून पॅन कार्ड तयार केले होते त्यांना आधार आणि पॅन लिंक करावे लागणार आहे.
जे लोक आधार आणि पॅन लिंक करणार नाहीत त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण की अशा लोकांचे पॅन कार्ड एक जानेवारीपासून निष्क्रिय होणार आहे. आता आपण पॅन कार्ड लिंक केले नाही तर नेमके कोण कोणते काम अडकणार याबाबत माहिती पाहुयात.
आधार आणि पॅन लिंक केले नाही तर काय होणार?
अनेकदा मोठ्या आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड द्यावे लागते. एका मर्यादेपेक्षा जास्त सोने खरेदी करताना सुद्धा पॅन कार्ड द्यावे लागते. दरम्यान ज्या वित्तीय कामांमध्ये पॅन कार्ड आवश्यक असेल ते सर्व वित्तीय काम केवळ पॅन आणि आधार लिंक नसल्याकारणाने अडकू शकतात.
आयकर दात्यांना आयटीआर रिफंड मिळणार नाही. आयकर परतावा मिळवताना अडचणी येण्याची शक्यता आहे. प्रलंबित टॅक्स रिफंड आधार आणि पॅन लिंक नसल्यास अडकून पडतील.
ज्या लोकांचे आधार आणि पॅन लिंक राहणार नाहीत त्यांच्यासाठी टीडीएस आणि टीसीएस कपातीचा दर वाढू शकतो.
आधार आणि पॅन लिंक नसल्यास नवीन बँक खाते उघडण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन केवायसी करण्यासाठी अडचणी निर्माण होतील.