New Rules : 2025 हे वर्ष आता अंतिम टप्प्यात आल आहे. येत्या काही दिवसांनी नव्या वर्षाला सुरुवात होईल आणि हे नवीन वर्ष सुरू होण्याआधीच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
एक जानेवारी 2026 पासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित काही नियम बदलणार आहेत. दरम्यान आज आपण एक जानेवारीपासून कोणकोणते नियम बदलणार आणि याचा सर्वसामान्यांवर कसा परिणाम होणार याचीच सविस्तर माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

सोशल मीडिया वापराबाबत : सोळा वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापराबाबत शासनाकडून लवकरच मोठा निर्णय होण्याची अपेक्षा आहे. लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरण्यावर वयोमर्यादा आणि
पालक नियंत्रण लागू करण्याचा निर्णय शासन पातळीवर प्रस्तावित आहे आणि लवकरच याबाबत अंतिम निर्णय होईल. हा निर्णय झाल्यानंतर लहान मुलांच्या सोशल मीडियावर पालकांचे लक्ष राहणार आहे. यामुळे लहान बालकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य अबाधित राखता येणार आहे.
पीएम किसान योजनेसाठी नवीन आयडी : पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी देखील नवीन नियम लागू केले जाणार आहेत. नव्या वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून पीएम किसान योजनेच्या काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी आता युनिक आयडी म्हणजेच फार्मर युनिक आयडी बंधनकारक करण्यात आली आहे.
थर्ड पार्टी ॲप्स वापरणाऱ्यांना दणका : नव्या वर्षात थर्ड पार्टी ॲप्स जसे की पेटीएम, अमेझॉन पे किंवा मोबिक्विक यांसारख्या थर्ड पार्टी एप्लीकेशन मधून 5000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास एक टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड द्वारे जर गेमिंग प्लॅटफॉर्मवर व्यवहार केले तर दोन टक्के शुल्क द्यावे लागणार आहे.
पॅन कार्ड होणार निष्क्रिय : केंद्रातील सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक केले आहे. पॅन कार्ड आधार सोबत लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
दरम्यान या मुदतीत जे लोक आपले पॅन कार्ड आधारला लिंक करणार नाहीत त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येणार आहे. अशा लोकांचे पॅन कार्ड एक जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. त्यामुळे अशा लोकांना वित्तीय व्यवहार करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
क्रेडिट स्कोरचे नियम बदलणार : क्रेडिट स्कोर अर्थातच सिबिल स्कोर हा कर्ज घेताना आवश्यक असतो. सिबिल स्कोर 300 ते 900 दरम्यान गणला जातो आणि चांगला सिबिल स्कोर असल्यास बँकांकडून कमी व्याजदरात आणि ताबडतोब कर्ज मंजूर होते.
खरे तर सध्या स्थितीला सिबिल स्कोर हा पंधरा दिवसांनी अपडेट होतो. मात्र आता हा कालावधी कमी करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता सिबिल स्कोर प्रत्येक आठवड्याला अपडेट केला जाणार आहे.
या निर्णयामुळे कर्ज प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे आणि याचा बँकांसमवेत ग्राहकांना सुद्धा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्ज वितरण प्रक्रिया आणखी जलद होईल अशी आशा आहे.
एलपीजी गॅस सिलेंडरचे रेट चेंज होणार : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडर चे रेट अपडेट केले जातात. नव्या वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा असेच होणार आहे.
1 जानेवारी 2026 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या म्हणजेच 14.2k एलपीजी गॅस सिलेंडरच्या आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर अर्थात 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती अपडेट होणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत यामुळे आता जानेवारी महिन्यात या किमती वाढणार की घटणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.