बातमी कामाची ! दुचाकीचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर किती दंड भरावा लागतो ? वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:
Two Wheeler Insurance

Two Wheeler Insurance : आपल्यापैकी अनेकजण दुचाकी वापरत असतील. दैनंदिन कामासाठी दुचाकी वापरणाऱ्यांची संख्या आपल्या देशात खूपच अधिक आहे. विशेष म्हणजे दुचाकींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक दुचाकीची संख्या पाहायला मिळत आहे. दरम्यान दुचाकी वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे दुचाकीचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर किती दंड भरावा लागू शकतो ? याबाबत कायदा काय सांगतो,

याविषयी आज आपण अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरंतर आपल्यापैकी अनेकांनी बाईकचे इन्शुरन्स काढलेले असेल. मात्र काहींनी बाईकचे इन्शुरन्स काढलेले नाहीये. यामुळे काही लोक जर बाईकचा इन्शुरन्स काढलेला नसेल तर ट्रॅफिक पोलिसांकडून किती दंड वसूल केला जाऊ शकतो ?

याबाबत कायद्यामध्ये काय तरतूद आहे असा प्रश्न उपस्थित करत आहेत. खरंतर इन्शुरन्स काढलेला नसेल तर हा एक गुन्हा समजला जातो. मोटर व्हेईकल्स कायदा 1998 नुसार, कार इन्शुरन्स पॉलिसीशिवाय वाहन चालवणे कायद्याच्या विरोधात आहे.

म्हणजेच इन्शुरन्स नसेल तर असे वाहन चालवणे एक गुन्हा समजला जातो. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे भारतामध्ये थर्ड पार्टी लायबिलिटी इन्शुरन्स असणे हे बंधनकारक आहे. दरम्यान, मोटर व्हेईकल कायद्यानुसार, देशात रस्त्यांवर चालवल्या जाणाऱ्या सर्व वाहनांसाठी वाहन इन्शुरन्स अनिवार्य आहे.

पॉलिसीधारकाकडे न चुकता मूलभूत थर्ड पार्टी इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. यासोबतच वाहनाची मालकी असलेल्यांनी स्वतःकडे इन्शुरन्ससंबंधित डॉक्यूमेंट जवळ बाळगायला हवं. जर समजा वाहनचालकाकडे पॉलिसी डॉक्यूमेंट नसेल तर अशा वाहनचालकांकडून इन्शुरन्स नसल्याच्या कारणाने दोन हजारांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.

यामुळे वाहनाचे इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला जेव्हाही पोलीस अडवतील तेव्हा मोठा दंड भरावा लागणार आहे. एकंदरीत भारतात विना इन्शुरन्स वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. यामुळे कोणीच विना इन्शुरन्स वाहन चालवू नये असे आवाहन पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अन्यथा वाहनाचालकांना मोठा दंड भरावा लागेल अशी तंबी पोलिसांनी दिलेली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe